पितृ पक्षाचा (Pitru Paksha ) कालावधी सुरू असुन येत्या 25 तारखेला तो संपणार आहे. या काळात श्राद्ध आणि तर्पण यांचे विशेष महत्त्व आहे. पितृ पक्षात, कुटुंब पिंडदान, तर्पण आणि पितरांच्या नावाने श्राद्ध करतात. यामुळे आपले पूर्वज प्रसन्न होऊन कुटुंबाला आशीर्वाद देतात. श्राद्ध पक्षात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. पितृपक्षात यापैकी कोणत्याही एका वस्तूचे दान केल्यास पितराची शांती होते, असे मानले जाते. यासोबतच घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. पितृ पक्ष आणि श्राद्ध पक्षात पुढील गोष्टींचे दान केल्याने मोठे पुण्य प्राप्त होते.
अन्नदान महान दान: पितृपक्षात अन्नदान करणे हे श्रेष्ठ दान मानले जाते. यामुळे पितरांना समाधान मिळते. यामुळे त्यांच्या आशीर्वादाने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
गुळाचे दान: पितृ पक्षात गुळाचे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. गुळाचे दान केल्याने संपत्तीच्या आगमनाचा मार्ग खुला होतो. गुळाचे दान केल्याने सूर्याची कृपा कायम राहते असे मानले जाते.
काळे तीळ दान करणे: पितृपक्षात काळ्या तीळाचे दान करावे. श्राद्ध पक्षात जी व्यक्ती अन्न दान करु शकत नाही, त्यांनी पितरांचे ध्यान करताना मूठभर काळे तीळ दान करावे, असे मानले जाते. यामुळे पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. ज्यामुळे घरात सुख-समृद्धी टिकून राहते.
चांदीचे दान: पितृ पक्षात चांदीचे दान केल्याने शुभ फळ मिळते असे शास्त्रात सांगितले आहे. असे मानले जाते की ज्या दिवशी तुम्ही श्राद्ध करत असाल त्या दिवशी चांदीच्या वस्तू दान कराव्यात. जर तुम्ही त्या दिवशी देऊ शकत नसाल तर सर्व पितृ अमावस्येला तुम्ही चांदीची कोणतीही वस्तू दान करू शकता. चांदीचा संबंध चंद्र ग्रहाशी आहे. त्यामुळे चांदी दान केल्यावर चंद्र देवांचा आशीर्वाद मिळतो.
टिप्पणी पोस्ट करा