स्टेट बँक ऑफ इंडियाने PO च्या 1673 पदांसाठी मागवले अर्ज

 


सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी  एक उत्तम संधी चालून आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO) ची भरती जाहीर केली आहे. बँकेने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया 22 सप्टेंबरपासून सुरू झाली असून ती 12 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. इच्छुक अर्जदार बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात(sbi po recruitment 2022).

स्टेट बँक ऑफ इंडियाने 1673 पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.  SBI PO साठी अर्ज करणारे अर्जदार पदवीधर असणे आवश्यक आहे. SBI PO च्या 1673 पदांपैकी 648 अनारक्षित आहेत, तर 464 OBC, 270 SC, 131 ST आणि 160 EWS श्रेणीतील अर्जदारांसाठी आहेत. बँकेने अर्जदारांची वयोमर्यादा 30 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी ठेवली आहे. केंद्र सरकारच्या आरक्षण नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत असुन. अर्जासाठी अर्जदारांना 750 रुपये शुल्क भरावे लागेल. एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला अर्जदारांना शुल्क भरावे लागणार नाही.

SBI PO साठी प्राथमिक परीक्षा १७, १८, १९, २० डिसेंबर २०२२ रोजी घेतली जाईल. जे अर्जदार प्राथमिक परीक्षेत पात्र ठरतील त्यांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल त्यानंतर सायकोमेट्रिक चाचणी घेतली जाईल. यामध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांना नोकरीसाठी पत्र दिले जाईल.

असा करा ऑनलाइन अर्ज

- अर्जदाराला प्रथम अधिकृत वेबसाइट वर ibpsonline.ibps.in/sbiposep22 नोंदणी करावी लागेल.

- वेबसाइट अर्जदाराला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड देईल ज्याने लॉग इन करायचे आहे.

- यानंतर, SBI PO अर्ज 2022 सबमिट करावा लागेल.

- यानंतर अर्जदारांना शुल्क भरावे लागेल.

- एकदा पैसे भरल्यानंतर, अर्ज यशस्वीरित्या जमा होईल.

- यानंतर भविष्यातील संदर्भासाठी अर्जदारांनी त्याची प्रिंट आउट घ्यावी.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने