ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय(Queen Elizabeth II died) यांचे निधन

 


ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचे गुरुवारी निधन झाले. त्या 96 वर्षांच्या होत्या. स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे राणी एलिझाबेथ यांचे निधन झाले. 1952 मध्ये राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वडील जॉर्ज सहा यांच्या निधनानंतर त्या राणी बनल्या, तेव्हा त्यांचे वय अवघे २५ वर्षे होते.

राणी एलिझाबेथ यांचा जन्म २१ एप्रिल १९२६ रोजी झाला. त्यावेळी ब्रिटनमध्ये राजा पाचवा जॉर्ज राज्य करत होता. एलिझाबेथचे वडील किंग जॉर्ज पंचम नंतर ब्रिटनचे राजा बनले. राणी एलिझाबेथचे पूर्ण नाव एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी विंडसर होते.राणीच्या निधना नंतर स्कॉटलंडची संसद निलंबित करण्यात आली आहे. 

राणी एलिझाबेथ द्वितीय राणीचे पार्थिव प्रथम रॉयल ट्रेनने एडिनबर्ग येथे आणले जाईल. नंतर ते पार्थिव रॉयल माईल ते सेंट गाइल्स कॅथेड्रलपर्यंत नेले  जाईल. येथे राजघराण्यातील सदस्य आणि सर्वसामान्य जनता त्यांना श्रद्धांजली वाहतील. यानंतर त्यांचे पार्थिव रॉयल ट्रेनमध्ये ठेवून लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये आणले जाईल.राणीचे पार्थिव विमानाने लंडनलाही आणले जाण्याची शक्यता आहे. त्यांचे पार्थिव लंडनमध्ये पंतप्रधान आणि मंत्रिमंडळातील सदस्य स्वीकारणार आहेत. त्यानंतर त्यांच्यावर वेस्टमिन्स्टर अॅबे  येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल भारताचे पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला. त्यांनी ट्विट करून आपलया भावना पुढील शब्दात व्यक्त केल्या आहेत 'महाराणी एलिझाबेथ II या आमच्या काळातील एक दिग्गज म्हणून स्मरणात राहतील. त्यांनी आपल्या देशाला आणि लोकांना प्रेरणादायी नेतृत्व दिले. सार्वजनिक जीवनात त्यांनी प्रतिष्ठा आणि सभ्यता दाखवली. त्यांच्या निधनाने मी दुखावलो आहे"

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने