Raj Thackeray: राज ठाकरे यांनी मानले पोलिसांचे आभार, कारण आहे खास

 


        ब्युरो टीम : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील पोलिसांचे आभार मानले आहेत. राज्यातील गणेश उत्सव शांततेत पार पाडण्यामध्ये पोलिसांचे योगदान खूप मोठे असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळेच त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहे. सोशल मीडियावर त्यांनी याबाबत पत्र टाकले आहे.

        कोरोना महामारीनंतर यंदा राज्यात गणेश उत्सव मोठ्या उत्साह व धुमधडाक्यात साजरा झाला. सर्वत्र या उत्सवामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यंदाचा गणेश उत्सव हा निर्बंध मुक्त असला तरी सर्वत्र शांततेत  साजरा झाला. यामध्ये पोलिसांचे योगदान हे खूप मोठे होते. त्यामुळेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  सोशल मीडिया पत्र टाका पोलिसांचे आभार मानले आहेत. 

        राज ठाकरे यांनी पत्रामध्ये म्हटलंय की, 'राज्यात गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला . कोरोनानंतरचा हा पहिला मोठा सण . हा सण अतिशय उत्सहात पार पडला , आणि तो देखील कोणतंही गालबोट न लागता . ह्याला महाराष्ट्र पोलीस , विविध महापालिका , आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि अग्निशमन दलाचे मनापासून आभार . उत्सवाच्या काळात महाराष्ट्रातील अगदी कॉन्स्टेबल ते राज्याच्या पोलीस महासंचालकांपर्यंत आणि महापालिका , विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे सफाई कर्मचारी ते अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाप्रती महाराष्ट्र नवनिर्माण सेना अतिशय कृतज्ञ आहे .'

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने