रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आज जपानला रवाना होनार.

 

        ब्युरो टीम: मंगोलियाचा दौरा पूर्ण केल्यानंतर, रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आज 07 सप्टेंबर 2022 रोजी जपानला चार दिवसांच्या अधिकृत भेटीवर रवाना होनार असुन. रक्षा मंत्री 08 सप्टेंबर 2022 रोजी टोकियो येथे होणाऱ्या दुसऱ्या भारत-जपान मंत्रिस्तरीय संवादात सहभागी होतील त्यांच्या सोबत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर(Dr S Jaishankar) यांची देखील उपस्थिती राहणार असुन जपानी बाजूचे प्रतिनिधीत्व जपानचे संरक्षण मंत्री श्री.यासुकाझू हमादा (Yasukazu Hamada) आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री  श्री योशिमासा हयाशी (Yoshimasa Hayashi).
        या संवाद वार्ताचा उद्येश भारत व जपान यांचे सर्व क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्याचे पुनरावलोकन करणे आणि पुढील मार्गाची आखणी करणे असा आहे. भारत आणि जपान या दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना आता ७० वर्षे पूर्ण होत आहेत. या द्विपक्षीय संवादाव्यतिरिक्त (India Japan bilateral talk) श्री राजनाथ सिंह वेगवेगळ्या क्षेत्रात दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्या जपानी समकक्षांशी स्वतंत्रपणे द्विपक्षीय चर्चा करतील. या भेटीदरम्यान ते जपानचे पंतप्रधान श्री फ्युमियो किशिदा यांचीही भेट घेणार आहेत.रक्षा मंत्री टोकियो येथील भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या सामुदायिक कार्यक्रमाला देखील उपस्थित राहतील आणि जपानमधील भारतीय डायस्पोराशी संवाद साधतील.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने