तामिळनाडूच्या DMK सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) 2 ऑक्टोबर गांधी जयंती रोजी रॅली काढण्याची परवानगी नाकारली आहे. सरकारने 'वैचारिकदृष्ट्या विरोधी राजकीय पक्षांमध्ये संघर्ष होऊ नये' म्हणून परवानगी नाकारण्यात येत आहे असे कारण दिले आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (PFI) बंदी घातल्यानंतर राज्यात तणाव वाढला होता.
दुसरीकडे, आरएसएसच्या सूत्रांनी 22 सप्टेंबरच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशाचा हवाला देत न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे. या निर्देशानुसार 2 ऑक्टोबरला संघाच्या प्रस्तावित मार्गक्रमणासाठी 28 सप्टेंबरपर्यंत परवानगी देण्यास पोलिसांना सांगण्यात आले होते. आरएसएसला गांधी जयंतीला राज्यभरात 51 ठिकाणी रॅली काढायची आहेत.
टिप्पणी पोस्ट करा