RSSORG: संघाला रोखण्याचा प्रयत्न केला. पण संघ थांबला नाही : डॉ. मनमोहन वैद्य


        ब्युरो टीम : काँग्रेसने (INC) आपलया ट्विटर हॅण्डल वरून केलेल्या ट्विटवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) गणवेश असणाऱ्या खाकी चड्डीचे एक छायाचित्र शेअर केले. आणि लिहले 'देशाला संघाच्या द्वेषातून मुक्त करण्यासाठी केवळ 145 दिवस शिल्लक राहिलेत'. यावर संघाचे (RSSORG) सह कार्यवाहक डॉ. मनमोहन वैद्य यांनी काँग्रेसच्या ट्विटला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले  'ते लोकांना द्वेषातून जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या बापजाद्यांनीही संघाचा खूप तिरस्कार केला. आपल्या पूर्ण ताकदीने संघाला रोखण्याचा प्रयत्न केला. पण संघ थांबला नाही. त्याची सातत्याने वाढ होत आहे.'

        काँग्रेसने 7 सप्टेबर भारत जोडो यात्रा सुरू केली होती. जी 150 दिवस चालेल या यात्रेत काँग्रेस पदाधिकारी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत प्रवास करणार आहे. तामिळनाडूमधुन सुरु झालेली ही यात्रा, सध्या केरळमध्ये आहे  राहुल गांधी हे या यात्रेचे नेतृत्व करत  असुन ती विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. 

        काँग्रेसच्या या ट्विटनंतर भाजप (BJP) नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला असून केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी सात जन्म जरी घेतले तरी आरएसएसची बरोबरी होणार नाही. प्रत्येक संघ स्वयंसेवक भारत मातेच्या गौरवासाठी जगतो. आरएसएस ही भारताच्या संस्कार आणि संस्कृतीची ध्वजवाहक आहे. ते जितके जळतील, तितका संघ सांस्कृतिक दृष्ट्या वाढेल.  

        दक्षिण बंगळुरूचे भाजप खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले की, 'काँग्रेसने 1984 साली दिल्ली पेटवली. काँग्रेसच्या इकोसिस्टमने 2002 मध्ये गोधरात कारसेवकांना जिवंत जाळले. आज पुन्हा एकदा त्यांनी हिंसाचाराचे आवाहन केले आहे. राहुल गांधी भारत सरकारविरोधात लढत आहेत. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस घटनात्मक पद्धतीवर विश्वास नसलेला पक्ष बनला आहे.'

        तसेच यावर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा, दिल्ली भाजपचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांच्यासह अनेक नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला आहे


 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने