जीवनात शनीदेवची कृपा हवी आहे (Shani Dev Remedies) तर हे वाचा.

 

        शनीदेवची (shanidev) एक अनामिक भीती सर्वांच्या मनात असते, परंतु शनीदेव ही न्याय देवता व  कर्माचा दाता असुन. शनिदेव व्यक्तीच्या चांगल्या-वाईट कर्मांचे फळ देतात. मनुष्याला मागील जन्माच्या कर्मानुसार चांगले-वाईट फळ मिळते तसेच आतापर्यंतच्या जीवनातील कर्माचा देखील प्रभाव यावर राहतो. यामुळेच शनिदेवाची कृपा झाली तर रंकाचा राजा बनवायला वेळ लागत नाही, तसेच शनिदेवाच्या अवकृपेने राजाचा देखील रंक होतो. ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेवतेची  अवकृपा माणसाला गरिबीच्या उंबरठ्यावर आणतो. अशा परिस्थितीत शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारी काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया शनिदेव कसे प्रसन्न होतात.

        शनिवारी शनिदेवाला काळे उडीद व मोहरीचे तेल अर्पण केल्याने व्यक्तीची आर्थिक समस्या दूर होते. तसेच कुंडलीत शनिदोषाचाही अंत होतो. शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. असे केल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारते. तसेच अनेक प्रकारच्या समस्यांपासून सुटका मिळते. जर तुमच्यासोबत खूप दिवसांपासून वाईट घटना घडत असतील तर हा उपाय तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी काळ्या वस्तूंचे दान करणे लाभदायक असते. काळी उडीद डाळ, काळे कपडे, काळे तीळ किंवा काळी हरभरा डाळ कोणत्याही गरजू व्यक्तीला दान करा. यामुळे व्यक्तीवरील साडे सतीचा प्रभाव कमी होतो आणि व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो.

        तुम्हाला साडेसाती (sadesaati) सुरु असेल व  शक्य असेल तर तुम्ही श्री क्षेत्र शनी शिंगणापूर (नगर जिल्हा ) किवां श्री क्षेत्र राक्षसभुवन (बीड जिल्हा) येथे जाऊन शनिदेव यांना शनिवारी अभिषेक करून शनिदेवतेची आराधना करू शकता यामुळे आपल्या जीवनातील कठीण वेळ सहजतेने निघुन जाण्यासाठी मदत होईल. तसेच तुम्ही सकाळी अंघोळी नंतर खालील मंत्राचा ११ वेळा जप करा 

नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम | छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम ||

स्रोत: astrozoom.in यांच्या बरोबरच्या विशेष करारा अंतर्गत.  


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने