सायरस मिस्त्री (Syrus Mestry) यांच्या बरोबर रतन टाटा (Ratan Tata) यांचा नेमका वाद काय होता.

 


टाटा सन्सचे (Tata sons) माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Syrus Mestry) यांचे गेल्या रविवारी मुंबईजवळ एका रस्ते अपघातात निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर सर्व स्थरातून विविध मान्यवरांच्या प्रतिक्रिया आल्या पण रतन टाटा(Ratan Tata) यांनी मात्र यावर मौन राखणे पसंद केले. कदाचित रतन टाटा आपले त्यांच्या बरोबर असलेले मतभेद विसरलेले दिसत नाहीत. टाटा समूहाच्या 30 मोठ्या कंपन्या आहेत, या कंपन्यांमध्ये टाटा सन्सचे शेअर्स आहेत. टाटा सन्स थेट टाटा कुटुंबाच्या मालकीची नाही. टाटा सन्सचा सर्वात मोठा भागधारक टाटा ट्रस्ट आहे. टाटा ट्रस्टकडे टाटा सन्सचे ६६% पेक्षा जास्त शेअर्स आहेत. टाटा कुटुंब या ट्रस्टच्या माध्यमातून संपूर्ण समूहावर नियंत्रण ठेवते. परंतु टाटा कुटुंबापेक्षा यात मोठा भागधारक सायरस कुटुंब आहे. त्यांच्याकडे 18.5% शेअर्स आहेत. 

रतन टाटा 2012 पर्यंत टाटा सन्सचे अध्यक्ष होते. त्यांनी सायरस मिस्त्री यांना आपला उत्तराधिकारी बनवले. सायरस मिस्त्री 2006 पासून टाटा सन्सच्या बोर्डाचे सदस्य होते. टाटांप्रमाणेच ते पारशी समाजाचे आहेत. तसेच त्यांच्या बहिणीचा विवाह रतन टाटा यांचा सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याशी झाला आहे. सायरस मिस्त्री यांनी चेअरमन बनण्याआधी एक वर्षापर्यंत रतन टाटा यांच्या बरोबर काम केले होते. परंतु २०१२मध्ये सायरस मिस्त्री यांनी जबादारी स्वीकारल्या नंतर अचानक 2016 मध्ये, टाटा सन्सच्या संचालक मंडळाने सायरस मिस्त्री यांना काढून टाकले. त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपायला त्यावेळस फक्त पाच महिने बाकी होते. 

सायरस मिस्त्री हे दिलेली योजना पूर्ण करू शकत नसल्याची तीन कारणे देण्यात आली होती, टाटा मोटर्स, टाटा स्टील या कंपन्या तोट्यात चालल्या आहेत. एकट्या टीसीएसच्या जोरावर टाटा समूह किती काळ टिकेल? कंपन्यांचे उत्पन्न वाढत नाही, त्यामुळे टाटा ट्रस्टला कमी लाभांश मिळत आहे. टाटा ट्रस्टला मिळणाऱ्या लाभांशातून ट्रस्ट शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालये चालवते. कमी लाभांशामुळे धर्मादाय कार्यावर परिणाम होत आहे अशी हि कारणे होती.   सायरस मिस्त्री यांनी हे आरोप फेटाळून लावले होते व  त्यांना काम करू दिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच निवृत्तीनंतरही रतन टाटा कामात त्यांच्या कामात ढवळाढवळ करतात असा त्यांचा आक्षेप होता.

या प्रकरणा नंतर टाटा समूहाविरुद्ध सायरस मिस्त्री यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. परंतु टाटा सन्स ही खासगी कंपनी असल्याचे न्यायालयाने सांगितले यामुळे सार्वजनिक किंवा सूचीबद्ध कंपन्यांचे नियम त्याला लागू होत नाहीत यामुळे सायरस मिस्त्री यांना माघार घ्यावी लागली. टाटा सोडल्यानंतर सायरस मिस्त्री हे आपल्या कौटुंबिक मालकीच्या शापूरजी पालनजी ग्रुप यात परतले नाहीत. त्यांनी स्वतःचा व्हेंचर फंड सुरू केला. त्यांना टाटा सन्समधील शेअर्स विकायचे होते. परंतु टाटा त्यांना बाहेर कोणाला विकू देत नव्हते. तसेच ते स्वतः विकत घेत नव्हते. सायरस मिस्त्री यांचे कुटुंब त्यांच्या शेअर्स साठी 1 लाख 76 हजार कोटी रुपये मागत होते तर टाटा 80 हजार कोटी रुपये देण्यास तयार होते. हे भांडण कोर्टात सुरूच होते. परंतु  आता सायरस मिस्त्री यांचा एका अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने