T20 World Cup साठी बीसीसीआय ने केली भारतीय संघाची घोषणा



ब्युरो टीम: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची आज  बीसीसीआयने घोषणा केली. गेल्या काही स्पर्धा आणि ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या पाहून यावेळी भारतीय संघ जाहीर करताना काही धक्के देत खेडाळुची निवड केली आहे. 

         आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने भरपूर प्रयोग केले होते. हे प्रयोग करण्यामागे खेळाडूंची विश्वचषकासाठी चाचपणी घेणे, हे एकमेव ध्येय होते. भारतीय संघाने गेल्या ९ महिन्यांमध्ये तब्बल सात कर्णधारही बदलल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे कायम ठेवण्यात आले आहे. विश्वचषकासाठी अष्टपैलू खेळाडूंवर भारतीय निवड समितीने जास्त भर देण्याचे ठरवले आहे. कारण अष्टपैलू खेळाडू हे संघासाठी बाराव्या खेळाडूचे काम करत असतात. हार्दिक पंड्याने ही गोष्ट आशिया चषक स्पर्धेत करून दाखवली होती. रवींद्र जडेजा हा भारताचा हुकमी अष्टपैलू खेळाडू असल्याचे समजले जाते. पण जडेजाच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. त्यामुळे तो या विश्वचषकात खेळणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. पण यावर आता बीसीसीआयने स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे.

     आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला वेगवान गोलंदाजांची उणीव जाणवत होती. कारण जसप्रीत बुमरा आणि हर्षल पटेल हे दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकले नाहीत. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज आवेश खानला ही स्पर्धा सुरु असताना ताप आला होता आणि यामधून तो बाहेर पडू शकला नव्हता. त्यामुळे या आशिया चषकातील काही सामने त्याला खेळता आले नव्हते. या स्पर्धेसाठी संघात दीपक चहरला संधी देण्यात आली होती, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी दिली गेली नाही. भारतीय संघ यावेळी जास्तकरून भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग यांना जास्त संधी देण्यात आली होती.

     भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत फिरकी गोलंदाजांवर जास्त भर दिला होता. युजवेंद्र चहलला यावेळी चांगली संधी देण्यात आली. त्याचबरोबर रवी बिश्नोई आणि आर. अश्विन यांना फक्त एकाच सामन्यातच संधी देण्यात आली होती. त्यामुळे भारतीय संघाने फिरकीपटूंबाबत आपला निर्णय जवळपास घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.

     भारतीय संघाने आपली फलंदाजी मात्र चांगलाच चाचपडून पाहिली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव यांचे संघातील स्थान जवळपास निश्चित समजले जात आहे. त्याचबरोबर रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यापैकी कोणाला निवडायचे, याचा विचारही बीसीसीआयने यावेळी केला आहे.

       ICC T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने