भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना उद्या 2 ऑक्टोबर (रविवार) रोजी गुवाहाटी येथे होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू गुरुवारी गुवाहाटी येथे पोहोचले असुन. हा सामना गुवाहाटी येथील भूपेन हजारिका क्रिकेट स्टेडियम येथे होणार आहे. पहिल्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव करून टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ( The second match of the T20 series between India and South Africa.)
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. पाहुण्या संघाने भारताच्या गोलंदाजीसमोर गुडघे टेकले होते. दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ अवघ्या 9 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. भारताकडून अर्शदीपने अप्रतिम गोलंदाजी करताना ३ बळी आणि चहरने २ बळी घेत दक्षिण आफ्रिकेचे कंबरडे मोडले होते. त्यामुळे टीम इंडियाने पहिल्या T20 मध्ये शानदार विजयाची नोंद केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा हा सलग तिसरा विजय आहे. आता दुसऱ्या T20 सामन्यातही रोहितच्या सेनेला विजय मिळवून मालिका काबीज करायची आहे.
गुवाहाटीच्या बुर्सपारा क्रिकेट स्टेडियमवर दोन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जात असुन, याआधी भारताने येथे आतापर्यंत फक्त दोन T20 सामने खेळले आहेत, त्यापैकी पहिला सामना श्रीलंकेविरुद्धचा होता जो पावसामुळे रद्द झाला होता. तर दुसऱ्या T20 मध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या स्टेडियमच्या खेळपट्टीवर आतापर्यंत 4 टी-20 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने दोनदा तर पाठलाग करणाऱ्या संघाने दोनदा विजय मिळवला होता. गुवाहाटीच्या खेळपट्टीवर टी-20 ची सरासरी 127 धावांची आहे. या खेळपट्टीवर 160-170 धावांचे लक्ष्य ठेवले तरी त्याचा पाठलाग करणे सोपे जाणार नाही.
भारत संभाव्य संघ पुढील प्रमाणे राहील: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, दीपक चहर, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह आणि युवेंद्र चहल.
दक्षिण आफ्रिका संभाव्य संघ पुढील प्रमाणे राहील: टेंबा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, रिले रॉसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, तबरीझ शम्सी, एनरिक नोर्टजे, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
टिप्पणी पोस्ट करा