चहा प्रेमी (Tea Lover) आहात, तुम्ही शुद्ध चहा (Pure Tea) पीत आहात ना?

 



चहा (Tea) हा भारतीयांच्या जीवनातला जिव्हळ्याचा विषय. चाय पे चर्चा करत करत आम्ही भारतीय जीवनातील बऱ्याच गोष्टीचे निर्णय घेतो. चहा हा संवादाचा सहज साधा-सोपा पर्याय असतो. सकाळी झोपेतून उठल्यानंतर अनेकांचा दिवस  चहाच्या कपाने सुरु होतो. सकाळी सकाळी चहाचा एक कप  दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळुन देतो. पण ज्या चहाने तुम्ही दिवसाची सुरूवात करता तो चहा खरचं किती शुद्ध (Pure Tea) आहे? तो भेसळयुक्त तर नाही ना? आजकाल बाजारात मिळणाऱ्या कितीतरी खाद्य पदार्थांमध्ये भेसळ असते, जी चहा पावडर मध्ये  देखील असू शकते. चहा पावडर मधील भेसळी मुळे दिवस खराब होण्याबरोबर आरोग्यावरही परिणाम होतो.

प्रमाणात चहा प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो, हे विविध संशोधनाअंती समोर आले आहे. चहामध्ये फ्लेव्होनॉइड्स (Flavonoids) आणि अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) नावाचे घटक असतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसेच चहा हा शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण  कमी करण्यासाठी आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे या कारणाने किवां चर्चा करण्यासाठी तुम्हालाही चहा प्यायला आवडत असेल, तर चहाची शुद्धता कशी तपासावी याच्या काही सोप्या पद्धती आहेत. यास  फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने देखील दुजोरा दिलेला आहे.  

चहा मधील भेसळ ओळखण्यासाठी सर्व प्रथम एक फिल्टर पेपर घ्या. त्यावर चहाची पावडर पसरवून ठेवा, नंतर त्यावर थोडे पाणी शिंपडा जेणेकरून फिल्टर पेपर ओले होईल. आता तो फिल्टर पेपर पाण्याने धुवा त्या वरून चहाची पावडर निघेल, आणि जर चहा पावडरमध्ये भेसळ असेल तर तुम्हाला फिल्टर पेपरवर डाग दिसतील. चहाची पावडर खराब असल्यास फिल्टर पेपरचा रंग तपकिरी किंवा काळा होऊ शकतो. जर चहा पावडर शुद्ध असेल तर फिल्टर पेपरवर कोणताही डाग दिसणार नाही.

तर चहा प्रेमींनी भेसळ ओळखन्यासाठी वरील सोपा उपाय करण्यास हरकत नाही. शुद्ध चहा पिल्याने तुमच्या आरोग्याला देखील हानी पोहोचणार नाही आणि काय माहित चहाचा आस्वाद घेता घेता तुम्ही देखील तुमच्या जीवनात एखाद्या मोठ्या पदाला गवसणी घालु शकता.     

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने