दिवसातून दोन कप चहा (TEA) प्यायल्याने तुम्ही दीर्घायुष्य बनू शकता?

 


        चहा हे भारतातील लोकप्रिय आणि मुख्य पेय आहे, चहा पित नाही असा व्यक्ती भारतात सापडणे विरळच तुम्ही जर चहा पित असाल तर हि बातमी तुम्हाला नक्कीच दिलासा देणारी आहे. ब्रिटन मध्ये झालेल्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की चहा पिल्याने तुमचे आयुष्य वाढु शकते. जे लोक चहा पीत नाहीत त्यांच्याशी तुलना केल्यास, जे लोक दररोज दोन किंवा अधिक कप चहा पितात त्यांना मृत्यूचा धोका 9% ते 13% कमी असतो (9% and 13% lower risk of mortality), असे संशोधकांना आढळुन आले आहे. 

        अॅनल्स ऑफ इंटर्नल मेडिसिनमध्ये (Annals of Internal Medicine) प्रकाशित झालेल्या निष्कर्षांत असे दिसुन आले आहे की त्या व्यक्तीने कॉफी, चहामध्ये यात दूध किंवा साखर टाकली अस, चहाचे तापमान काहीही असो परिणाम मात्र सारखेच दिसुन येतात.  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संशोधकांनी, संशोधनासाठी यूके बायोबँकचा डेटा वापरला, ज्यामध्ये 40 ते 69 वयोगटातील पाच लाख पुरुष आणि स्त्रिया यांचा समावेश होता. त्यातील 85% लोक नियमित चहाचे सेवन करणारे होते,  त्यापैकी ८९ टक्के लोकांनी काळी चहा पीत असल्याचे सांगितले.

        हा अभ्यास 2006 ते 2010 या कालावधीत केला गेला आणि एका दशकाहून अधिक काळ याचा पाठपुरावा करण्यात आला. मॅड्रिडच्या स्वायत्त विद्यापीठातील प्रतिबंधात्मक औषध आणि सार्वजनिक आरोग्याचे प्राध्यापक फर्नांडो रॉड्रिग्ज आर्टालेजो (Fernando Rodríguez Artalejo) यांनी या संशोधनाचे वर्णन “क्षेत्रातील भरीव प्रगती” म्हणून केले आहे. ते म्हणाले की बहुतेक अभ्यास आशियामध्ये केले गेले आहेत, जिथे हिरव्या चहाचा सर्वाधिक प्रमाणात वापर केला जातो"  ते पुढे म्हणाले “हा अभ्यास दर्शवितो की काळ्या चहाचा नियमित वापर (युरोपमध्ये सर्वाधिक प्रमाणात वापरला जाणारा चहा) करणारे  विशेषत, सामान्य मध्यमवयीन, प्रौढ व्यक्तींमध्ये हृदय व रक्तवाहिन्या संबंधी आजारामुळे होणारे मृत्यूदर कमी करण्याशी संबंधित आहे."

        ते म्हणाले की, "हा अभ्यास निश्चितपणे सांगु शकत नाही की चहा पिणाऱ्यांच्या कमी मृत्यूचे कारण चहा हेच आहे, परंतु चहा पिणे हे कारण आपण दुर्लक्षित करु शकत नाही कदाचित वाढणाऱ्या आयुष्याचे कारण चहाच्या सेवनाशी संबंधित इतर आरोग्यदायक घटक देखील असु शकतात. तसेच आणखी एक प्रश्न अनुत्तरीत आहे तो म्हणजे जे लोक चहा पीत नाहीत त्यांनी त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी असे करायला सुरुवात करायाला हवी का?"

        त्यांनी असेही सांगितले “कालानुरूप चहाच्या सेवनाचे वारंवार मोजमाप करून अभ्यास केला पाहिजे आणि ज्यांनी चहा पिणे सुरू केले आहे किंवा जे वर्षानुवर्षे चहा पीत आहेत तसेच त्यांनी कालांतराने त्यांचा वापर वाढवला आहे अशा लोकांच्या आरोग्याची सतत चहा न आरोग्याशी तुलना केली पाहिजे."

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने