भारतातील पदवीला युके (UK) मध्ये मान्यता.



        काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, यूके (ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लन्डचे) आणि भारत यांच्यातील एका सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली.या करारानुरास  परस्परांकडील शैक्षणिक पात्रतांना उभय देशांनी मान्यता देण्या बाबतच्या या सामंजस्य करारावर शिक्कामोर्तब झाले याबाबतच्या करारावर उभय देशांच्या  दि. 25.04.2022 रोजी स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.

        या करारात परस्परांकडील शैक्षणिक पात्रतांना मान्यता देणे, अभ्यासक्रमाचा कालावधी मान्य करणे आणि या दोन देशांतील शिक्षणसंस्थांनी दिलेल्या शैक्षणिक पदव्या/ पात्रतांशी संबंधित कागदपत्रे मान्य करणे ई. चा समावेश या सामंजस्य करारात मध्ये होत असुन अभियांत्रिकी, वैद्यक, परिचर्या आणि निम-वैद्यकीय शिक्षण, औषधशास्त्र, कायदा आणि स्थापत्यशास्त्र या क्षेत्रांतील व्यावसायिक शिक्षणाच्या पदव्या मात्र सदर सामंजस्य कराराच्या कक्षेत समाविष्ट नाहीत. उभय देशांतील उच्च शिक्षण संस्थांत संयुक्त / दुहेरी पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याची सुविधाही या सामंजस्य करारामुळे मिळू शकेल. 2020 च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात सांगितलेल्या- शिक्षणाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याच्या उद्दिष्टाला यामुळे चालना मिळेल.

        शैक्षणिक रचना, कार्यक्रम आणि गुणवत्ता यांबाबत माहितीचे व विचारांचे द्विपक्षीय आदानप्रदान करण्यास या सामंजस्य करारामुळे प्रोत्साहन मिळेल. तसेच उभय देशांदरम्यान विद्यार्थी आणि व्यावसायिक व्यक्ती व्यक्तींना अधिक सहजपणे दुसरीकडे जाण्याची मुभाही यामुळे मिळेल. तसेच शिक्षणक्षेत्रात अन्य पैलूंवर सहकार्य वाढवण्यास व उभय पक्षांनी मान्य केल्याप्रमाणे शैक्षणिक कार्यक्रम विकसित करण्यासही यामुळे प्रोत्साहन मिळेल.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने