अभिनेते, माजी केंद्रीय मंत्री यू.व्ही.कृष्णम राजू (uv krishnam raju) यांचं निधन

 

दक्षिण चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री यू.व्ही.कृष्णम राजू (uv krishnam raju) यांचं आज पहाटे निधन झाले ते  ८२ वर्षाचे होते. आज पहाटे ३.४५ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कृष्णम राजू हे दक्षिण चित्रपटसृष्टीचे बंडखोर स्टार मानले जात होते आणि त्यांनी चित्रपटसृष्टीत सक्रिय असताना  चित्रपटात काम केले आहे. मात्र शनिवारी रात्री त्यांची प्रकृती खालावली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कृष्णम राजू हे अभिनेता प्रभासचे (prabhas) काका होते. अभिनेत्याच्या निधनानंतर साऊथ सिनेसृष्टीतील तमाम स्टार्स आणि चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कृष्णम राजू यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिले आहे - ' श्री यूवी कृष्णम राजू गरू यांच्या निधनाने दु:ख झाले. येणाऱ्या पिढ्या त्यांच्या सिनेमातील तेज आणि सर्जनशीलता लक्षात ठेवतील. समाजसेवेतही ते आघाडीवर होते आणि राजकारणी म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यांच्या कुटुंबिय आणि चाहत्यां बरोबर माझ्या संवेदना, ओम शांती". 

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनीही कृष्णम राजू यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, "तेलुगू चित्रपटसृष्टीतील आवडते स्टार आणि माजी केंद्रीय मंत्री यू कृष्णम राजू गरू आम्हाला सोडून गेले हे जाणून दुःख झाले. त्यांनी आपल्या अष्टपैलू अभिनयाने लाखो मने जिंकली आणि समाजाच्या भल्यासाठी काम केले. त्याच्या जाण्याने आपल्या तेलुगु चित्रपटसृष्टीत एक खोल पोकळी निर्माण झाली आहे. माझ्या संवेदना."

कृष्णम राजूच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, सिनेमात येण्यापूर्वी ते पत्रकार होते. 1996 मध्ये त्यांनी 'चिलाका गोरनिका' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटाने त्यांनी चाहत्यांची मने जिंकली. या चित्रपटासाठी त्यांना नंदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर त्यांनी ज्येष्ठ अभिनेते एनटी रामाराव आणि अक्किनेनी नागेश्वर राव यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. कृष्णम राजू यांनी जवळपास 183 चित्रपटांमध्ये काम केले आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने