चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांना अटक ?

 


चीनचे  राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (President Xi Jinping) यांच्याबाबत काही वृत्तसंस्थेतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. चिनी माध्यमांनी या गोष्टींची पुष्टी केली नसली तरी, चिनी वापरकर्त्यांच्या ट्वीट्सवरून असे सूचित होते की अध्यक्ष शी जिनपिंग यांना पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) ने नजरकैदेत ठेवले आहे. चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) मध्ये कार्यरत असलेले जनरल ली क्‍याओमिंग हे येत्या काळात शी यांची जागा घेऊ शकतात, अशीही माहिती  ट्वीट्सवरून सूचित होते आहे.

जेनिफर झेंग (Jennifer Zeng) या चिनी मानवाधिकार कार्यकर्त्या, ज्या आता अमेरिकेत राहतात, त्यांनी ट्विटरवर (jenniferatntd) एक व्हिडिओ पोस्ट केला असून दावा केला आहे की पीएलए सेना बीजिंगकडे जात आहे. बीजिंगजवळील हुआनलाई काउंटीपासून सुरू होणारा  आणि हेबेई प्रांतातील झांगजियाकौ शहरात समाप्त होणारा सेनेचा संपूर्ण मार्च 80 किमी लांब आहे. दरम्यान, CCPच्या वरिष्ठांनी शी जिनपिंग यांना PLA प्रमुख पदावरून हटवल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे सांगितले जाते आहे.

ट्विटरवर असेही सूचित करण्यात आले आहे की चीनमधील जवळपास 60% विमानांची उड्डाणे शुक्रवारी कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय निलंबित करण्यात आली होती. तसेच अमेरिकेत राहणारे चिनी लेखक गॉर्डन चांग (GordonGChang) यांनी ट्विटरवर झेंगच्या व्हिडिओचा हवाला देत लिहिले: “बीजिंगमध्ये चालवलेल्या लष्करी वाहनांचा हा व्हिडिओ देशातील ५९% उड्डाणे ग्राउंड झाल्यानंतर लगेचच आला आहे, तसेच काही अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात आले. . खूप धूर आहे, याचा अर्थ CCP च्या आत कुठेतरी आग लागली आहे. चीन अस्थिर आहे."

विमान उड्डाणांची पुष्टी केली असता, फ्लाइट रडार दर्शविणार्‍या वेबसाईट वर चिनी हवाई क्षेत्रामध्ये सामान्य वाहतुकीपेक्षा खुप कमी वाहतूक दिसत असून फक्त देशांतर्गत उड्डाणे सुरु असल्याचे आढळून आले आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने