मुंबईत दहशतवाद्याच्या कबरीचे उद्दात्तीकरण ? याकुब मेमनच्या (Yakub Memon) कबरीवर लायटिंग अन् ....

 

        दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील दोषी याकुब मेमन याला फाशी देण्यात आल्या नंतर त्याचा मृतदेह दफन करण्यात आला होता. मात्र त्याच्या कबरीवर आता सजावट करण्यात आली असुन लायटिंग, तसेच संगमरवरच्या फरशा लावण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यासंदर्कभात कब्रस्तानमधील एक व्हिडीओ समोर आला असून त्यात, दहशतवादी याकुब मेमन याच्या कबरीवर संगमरवर फरशी, लायटिंग लावण्यात आल्याचे दिसत आहे.

        हा व्हिडीओ समोर आल्यानंतर दहशतवादी असलेल्या याकुब मेमन याच्या कबरीवर इतका खर्च कोण आणि कशासाठी करीत आहे असा प्रश्न निर्माण झाला असुन, त्याची कबर ही दह्शतवाद्यानसाठी  प्रेरणास्थान बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहेत. दहशतवाद्याच्या कबरीवर अशा प्रकारे सजावट होत आहे. आता हा प्रकार समोर आल्यावर मुंबई मनपा आणि राज्य सरकार यांच्याकडून या प्रकरणात काय कारवाई होते हे पहावे लागेल.

        यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली असुन 'मुंबई आणि मुंबईकरांना धुळीस मिळवण्याचे मनसुबे रचणाऱ्या याकूब मेमनच्या कबरीचे उदात्तीकरण करण्याचे काम सुरू असल्याचे वृत्त पाहिले. हे काम त्वरित थांबवून या कामाची चौकशी सरकारने करावी, हे धाडस कोणाकडून झाले हेही समोर यायला हवे, अशी भावना ट्विट करीत व्यक्त केली आहे

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने