राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

 


राज्यातील ग्रामपंचायतीसाठी आज मतदान सुरु झाले असून यात 1 हजार 165 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी आज मतदान सुरु झाले आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून ते  सायंकाळी पाच पाच वाजेपर्यंत सुरु राहील.

विदर्भातील देखील आठ जिल्ह्यांतील 160 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांसह सदस्यांच्या निवडीसाठी आज, रविवारी मतदान होत आहे. विदर्भातील 169 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी चार जिल्ह्यांतील 9 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. सर्वाधिक 94 ग्रामपंचायतीची चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. मतमोजणी 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने