ब्युरो टीम: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेफएक्सपो (DefExpo) 2022 दरम्यान संरक्षण क्षेत्रात स्वदेशी वापराच्या 101 वस्तूंची चौथी यादी केली जाहीर केली संरक्षण मंत्रालयाने उद्योग तसेच सर्व संबंधितांशी केलेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर चौथी यादी तयार केली आहे. यात विकासाच्या प्रक्रियेतील तसेच येत्या पाचदहा वर्षात मागणी नोंदवता येतील अशा उपकरणे/प्रणालींवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पहिल्या तीन याद्यांप्रमाणेच सातत्याने आवश्यकता असलेल्या दारूगोळा आयातीला पर्याय निर्माण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ही चौथी यादी भारतीय संरक्षण उद्योगाची वाढती क्षमता दर्शवते. तंत्रज्ञान तसेच उत्पादन क्षमतांमध्ये नवीन गुंतवणूक आकर्षित करून देशांतर्गत संशोधन आणि विकासाच्या क्षमतेला ती चालना देणारी आहे.
सशस्त्र दलांचा कल आणि भविष्यातील गरजा समजून घेण्यासाठी तसेच देशांतर्गत आवश्यक संशोधन आणि विकास, उत्पादन क्षमता निर्माण करण्यासाठी देशांतर्गत संरक्षण उत्पादन उद्योगाला पुरेशी स्पष्टता आणि संधी या चौथ्या यादीने निर्माण होणार आहे.
संरक्षण मंत्रालय यासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करेल आणि 'चौथ्या सकारात्मक स्वदेशीकरण यादी'मध्ये नमूद केलेल्या कालमर्यादा पूर्ण केल्या जातील याची खातरजमा करण्यासाठी उद्योगाला सर्वतोपरी सहकार्य करेल. यामुळे संरक्षण क्षेत्रास आत्मनिर्भरता प्राप्त होईल आणि देशातील निर्यातीसाठी क्षमता विकसित होईल. सर्व भागधारकांच्या माहितीसाठी ही यादी संरक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर www.mod.gov.in उपलब्ध आहे. अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा