ऑक्टोबरमध्ये अनेक सण असल्यामुळे, ऑक्टोबर महिन्यात बँकांना बरीच सुटी होती आणि किंवा कामाचा वेळ फारच कमी होता. आजपासून सुरु झालेल्या नोव्हेंबर महिन्यातही जवळपास 10 दिवस बँक बंद राहणार आहेत. जर या महिन्यात तुमच्याकडे बँकेशी संबंधित महत्वची कामे असतील तर ती वेळेत पूर्ण करा, जे डिजिटल व्यवहार करत नाहीत, त्यांनी आपली बँकेशी संबंधित कामे सुट्टीची माहिती घेऊन पूर्ण करावीत.
रिझर्व्ह बँक प्रत्येक कॅलेंडर वर्षासाठी सुट्टीची यादी तयार करते. ज्यात बँकेच्या सुट्ट्यांची माहिती दिली जाते. नोव्हेंबरमध्ये देशभरातील बँका काही ठिकाणी १० दिवस बंद राहणार आहेत. रिझव्र्ह बँकेने नोव्हेंबर महिन्यासाठी सुट्ट्यांची जी यादी जाहीर केली आहे, त्यातील अनेक सुट्ट्या राष्ट्रीय आहेत. त्या दिवशी देशभरात बँकिंग सेवा बंद राहतील. त्याच वेळी, काही सुट्ट्या फक्त स्थानिक किंवा प्रादेशिक स्तरावर असतील. त्या दिवशी फक्त संबंधित राज्यांमध्ये बँक बंद राहतील.
बँक सुट्टी नोव्हेंबर 2022 यादी
1 नोव्हेंबर : कन्नड राज्योत्सव आणि कुट मुळे इम्फाळ आणि बंगलोरमध्ये बँकेला सुट्टी पाळली जाईल.
6 नोव्हेंबर : 6 नोव्हेंबर रविवार असल्याने बँका बंद राहतील.
8 नोव्हेंबर : गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा यानिमित्त बँका बंद राहतील.
11 नोव्हेंबर : बांगला सण आणि कनकदास जयंतीनिमित्त बंगळुरू आणि शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.
12 नोव्हेंबर : महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी बँका बंद राहतील.
13 नोव्हेंबर : रविवार असल्यामुळे सुट्टी आहे.
20 नोव्हेंबर : रविवार साप्ताहिक सुट्टी आहे.
23 नोव्हेंबर : सेंग कुत्स्नेममुळे शिलाँगमध्ये बँकेला सुट्टी असेल.
26 नोव्हेंबर : महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.
27 नोव्हेंबर : रविवारची बँकेला सुट्टी असेल.
टिप्पणी पोस्ट करा