ज्ञानवापी मशीद प्रकरणात आता 11 ऑक्टोबरला सुनावणी

 


ज्ञानवापी मशीद प्रकरणात न्यायालयाने मुस्लिम बाजूच्या आक्षेपासाठी वेळ दिला असून, खटल्याचा निर्णय पुढे ढकलला. ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाबाबत यापूर्वी न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला. जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात शुक्रवारी या प्रकरणी न्यायालयाने मुस्लिम पक्षाला ११ ऑक्टोबर रोजी बाजू मांडण्यासाठी सांगितले आहे. त्याचवेळी दोन्ही बाजूंच्या एकूण 64 जणांना न्यायालयात हजर राहण्याची परवानगी देण्यात आली.

वास्तविक, ज्ञानवापी सर्वेक्षणादरम्यान सापडलेल्या शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगची मागणी हिंदूंच्या बाजूने करण्यात आली होती. यावरील निर्णय न्यायालयाने अजुन दिला नाही. आता 11 ऑक्टोबरला या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले की, या प्रकरणी न्यायालयाला अनेकांचे आक्षेप प्राप्त झाले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी सुरू राहणार आहे. ज्ञानवापी प्रकरणातील पाच महिलांच्या बाजूने सुनावणी करताना जिल्हा न्यायाधीशांनी कार्बन डेटिंगबाबत फिर्यादींकडून स्पष्टीकरण मागितले, तर अंजुमन प्रजातनिया मस्जिद समितीने याप्रकरणी बाजू मांडन्यासाठी  वेळ मागितला आहे, त्यामुळे पुढील सुनावणी 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने