शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी केंद्र सरकार सन्मान निधी योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे देणार

 


दिवाळीची धुमधाम सुरु झाली आहे आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मिळणाऱ्या 2 हजार रुपयांच्या हप्त्याची लाभार्थी शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता आता लवकरच जारी होणार आहे. केंद्र सरकारने सन्मान निधी योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे दिवाळीपूर्वीच करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, PM मोदी सोमवार, 17 ऑक्टोबर रोजी किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता जारी करतील.

किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान योजनेअंतर्गत, पंतप्रधान मोदी 16,000 कोटी रुपयांचा 12 वा हप्ता जारी करतील. पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र जमीनधारक शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयांचा आर्थिक लाभ मिळतो. दर चार महिन्यांनी, या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर 2,000 रुपयांचे तीन हप्ते हस्तांतरित केले जातात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 मे 2022 रोजी पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता जारी केला होता. पंतप्रधान मोदींनी सन्मान निधीचा 11 वा हप्ता म्हणून 21,000 कोटी रुपये जारी केले होते. पीएम किसान सन्मान निधी योजना ही पंतप्रधानांनी 2019 मध्ये सुरू केली होती. या योजनेचे पैसे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. पीएम किसान योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 2 लाख कोटी रुपयांहून अधिक आर्थिक मदतीचा लाभ मिळाला आहे.

या वेळी असे अनेक शेतकरी आहेत, ज्यांच्या खात्यात 12 व्या हप्त्याचे पैसे पाठवले जाणार नाहीत. माहितीनुसार, eKYC न केलेले शेतकरी आणि अपात्र शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीतून वजा केली जाऊ शकतात. तुम्ही सुद्धा 2000 रुपयांच्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर तुम्ही PM किसान पोर्टल pmkisan.gov.in वर जाऊन लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासू शकता.

यादीत तुमचे नाव पुढील प्रमाणे तपासा

1. pmkisan.gov.in या PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

2. आता होम पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या 'फार्मर्स कॉर्नर (Farmers Corner)' विभागात जा.

3. फार्मर्स कॉर्नर विभागात 'लाभार्थी स्थिती (Beneficiary Status)' या पर्यायावर क्लिक करा.

4. आता पीएम किसान खाते क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडा.

5. तपशील भरल्यानंतर 'डेटा मिळवा (Get Data)' वर क्लिक करा.

6. आता तुम्हाला तुमची स्थिती स्क्रीनवर दिसेल.

तुम्हाला 12व्या हप्त्याबाबत काही शंका किंवा तक्रारी असल्यास, तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 या पीएम किसान योजनेच्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही तुमची तक्रार ई-मेल आयडी (pmkisan-ict @gov.in) वर मेल करू शकता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने