देशातील आठ कोटी शेतकऱ्यांना काल सोमवारी सरकारकडून दिवाळी भेट मिळाली. येत्या 24 तारखेला सोमवारी देशभरात दिवाळीचा सण साजरा होणार आहे. त्याच्या पूर्वीच शेतकऱ्यांना सरकार कडून ही भेट मिळाली आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या (PM Kisan Samman Nidhi) लाभार्थी शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याअंतर्गत 2 हजार रुपये मिळनार असून पंतप्रधानांनी काल आठ कोटी शेतकऱ्यांना 16,000 कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राष्ट्रीय राजधानीत पीएम किसान संमेलन 2022 चे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे एकूण 16,000 कोटी रुपये आठ कोटी शेतकऱ्यांना हस्तांतरित केले. आतापर्यंत 11.3 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाल्याचे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ट्विट करून सांगितले आहे. ते म्हणाले की, या योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत एकूण 2 लाख कोटी रुपयांचे वाटप केले आहे. तोमर म्हणाले की, कोविड-19 महामारीच्या काळात सरकारने यापैकी सुमारे 1.6 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात सरकार एका आर्थिक वर्षात एकूण सहा हजार रुपये हस्तांतरित करते. सरकार ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना पाठवते.
सरकारने 12 व्या हप्त्याखाली पाठवलेले पैसे तुमच्या खात्यात आले आहेत की नाही हे तपासण्याचा मार्ग अगदी सोपा आहे. तुम्हाला पैसे मिळाले आहे की नाही ते तुम्ही असे तपासा
1. pmkisan.gov.in या PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. आता होम पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या 'फार्मर्स कॉर्नर (Farmers Corner)' विभागात जा.
3. फार्मर्स कॉर्नर विभागात 'लाभार्थी स्थिती (Beneficiary Status)' या पर्यायावर क्लिक करा.
4. आता पीएम किसान खाते क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडा.
5. तपशील भरल्यानंतर 'डेटा मिळवा (Get Data)' वर क्लिक करा.
तुम्ही दिलेली माहिती बरोबर आढळल्यास प्रत्येक इन्स्टॉलेशनची संपूर्ण माहिती येईल. इथे जर 12व्या हप्त्यासमोर 'पेमेंट प्रोसेस्ड (Payment Processed)' असे लिहिले असेल तर याचा अर्थ तुमचे पैसे तुमच्या खात्यात वळते झाले आहेत आणि येत्या काही दिवसांत ते तुमच्या खात्यात येतील
टिप्पणी पोस्ट करा