इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्या दरम्यान दंगल, 130 हून अधिक लोकांचा मृत्यू

 


इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान दंगल उसळली असून त्यात 130 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दंगल आणि चेंगराचेंगरीमुळे हे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना शनिवारी रात्री 10 वाजता पूर्व जावाच्या मलंग रिजन्सी येथील कंजुरुहान स्टेडियममध्ये घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फुटबॉल सामन्यातील हिंसाचार आणि त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 130 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, सुमारे 180 लोक जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर या सामन्यावर एका आठवड्यासाठी बंदी घालण्यात आली आहे(Riots during football match in Indonesia, more than 130 dead).

समजलेल्या माहितीनुसार पर्साबाया क्लब आणि अरेमा फुटबॉल क्लब यांच्यात पूर्व जावाच्या मलंग रीजेंसी येथील कंजुरुहान स्टेडियममध्ये सामना सुरू होता. या सामन्यात अरेमाचा संघ पराभूत झाला, यानंतर अरेमाच्या चाहते फुटबॉल कोर्टवर उतरले व गोंधळ माजवू लागले. यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला.

फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडोनेशिया (PSSI) ने शनिवारी उशिरा एक निवेदन जारी करून या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. पीएसआयने सांगितले की, कांजूरुहान स्टेडियमवर अरेमा समर्थकांनी केलेल्या गोष्टीबद्दल खेद व्यक्त करतो. आम्ही पीडित कुटुंबांची आणि या घटनेत नुकसान  झालेल्या सर्व पक्षांची माफी मागतो. या हिंसाचार आणि चेंगराचेंगरीनंतर फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडोनेशिया (PSSI) ने BRI Liga 1 लीगचे सर्व सामने एका आठवड्यासाठी स्थगित केले आहेत. यासोबतच अरेमा फुटबॉल क्लबच्या संघाला या हंगामातील उर्वरित सामने आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने