रेवा (मध्य प्रदेश) येथे भीषण अपघात 15 जण ठार, तर 40 प्रवासी जखमी

 


मध्य प्रदेशातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 30 वर भीषण अपघात झाला. हैदराबादहून - जबलपूर - प्रयागराज जाणाऱ्या बसमधील 15 प्रवाशांचा मृत्यू झाला. हे सर्व प्रवासी दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या घरी परतत होते. तसेच बसमधील 40 जण जखमी झाले आहेत. जखमींना टुंथर हॉस्पिटल आणि इतर हॉस्पिटलमध्येही दाखल करण्यात आले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्याचवेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही शोक व्यक्त केला असुन मृत आणि जखमींना नुकसान भरपाई जाहीर केली आहे.

रेवा जिल्ह्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग 30 वरील सोहागी टेकडीवर हा भीषण अपघात झाला. यामध्ये 15 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 40 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच सोहागी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यात आली. बस रेवाजवळील राष्ट्रीय महामार्गावर सोहागी डोंगरावर पोहोचली, तेव्हा समोरून जाणाऱ्या ट्रेलरला ती धडकली आणि हा अपघात झाला .

रीवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रस्ता अपघात शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री झाला. उत्तर प्रदेश पासिंगची बस हैदराबादहून जबलपूरहून प्रयागराज (उत्तर प्रदेश) रीवा मार्गे जात होती. ही बस रेवाजवळून जाणाऱ्या हायवेवरून जात असतानाच एका बाजूला मातीने भरलेला ट्रक उभा होता, या ट्रकचा आधीच अपघात झाला होता. त्याच्या मागून ही बस धडकली. हा अपघात इतका भीषण होता की सुमारे 14 जणांचा जागीच मृत्यू झाला. अनेक प्रवाशांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने