मसाला क्षेत्रासाठी जगातील सगळ्यात मोठा वैशिष्ट्यपूर्ण व्यापार मंच आणि ज्याचे आयोजन विविध व्यापार आणि निर्यात मंचाच्या संयुक्त सहकार्याने भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या भारतीय मसाले मंडळातर्फे केले जाते, असे जागतिक मसाला संमेलन 16 ते 18 फेब्रुवारी 2023 या कालावधीत महाराष्ट्रात नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन आणि परिषद केंद्र येथे भरणार आहे. या संमेलनात 50 पेक्षा जास्त देशांतील एक हजाराहून अधिक प्रतिनिधी सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
भारतीय मसाले मंडळातर्फे आयोजित केले जाणारे हे द्वैवार्षिक संमेलन जगभरातील मसाला उद्योगांना एकत्र येऊन या क्षेत्रातील समस्या आणि अपेक्षा याविषयी चर्चा करण्यासाठीचा प्रमुख मंच आहे. सद्यस्थितीत मसाला उत्पादन, प्रक्रिया, मूल्य वर्धन, दर्जा आणि सुरक्षितता, व्यापार आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन यांच्याबद्दल या संमेलनात विस्तृत चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. महत्त्वाचे आयातदार देश आणि जी-20 सदस्य देशांची व्यापार मंत्रालये आणि निर्यात प्रोत्साहन संस्था, या भारतीय मसाला उद्योगजगताशी चर्चा करतील अशी अपेक्षा आहे.
“या वेळी, भारताच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 2022 ते नोव्हेंबर 2023 या काळात जी-20 कार्यक्रम होणार आहेत, अशा वेळी जी-20 सदस्य देशांशी भारताचे व्यापारविषयक बंध अधिक मजबूत व्हावेत यावर लक्ष केंद्रित करून मसाला मंडळ जागतिक मसाला संमेलनाचे आयोजन करत आहे,” असे मसाला मंडळाचे सचिव, डी.साथियन यांनी सांगितले. महत्त्वाच्या आयातदार देशांची नियामकीय प्राधिकरणे आणि जी-20 सदस्य देशांचे व्यापार आणि उद्योगमंत्र्यांची संघटना या संमेलनात सहभागी होऊन संवाद साधतील.
या संमेलनासाठी ‘व्हिजन 2030 स्पाईसेस’ (SPICES-शाश्वतता-उत्पादकता-नवोन्मेष-सहकारी संबंध-उत्कृष्टता आणि सुरक्षितता) ही मध्यवर्ती संकल्पना आहे, ते पुढे म्हणाले. या संमेलनात सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु असून स्वारस्य असलेल्या भागधारकांनी त्यांचा सहभाग worldspicecongress यांच्या संकेतस्थळावर नोंदवावा. किवा 0484 2333610, Extn: 233, यावर संपर्क साधावा
टिप्पणी पोस्ट करा