20 वर्षात प्रथमच 8 उपग्रह वाहून नेणारे जपान स्पेस एजन्सीचे रॉकेट उड्डाण अयशस्वी.

 


आठ उपग्रह वाहून नेणारे जपानचे रॉकेट प्रक्षेपण बुधवारी उड्डाण झाल्यानंतर अयशस्वी झाले अशी माहिती जपानच्या स्पेस एजन्सीने दिली आहे. सुमारे 20 वर्षांत प्रथमच देशातील पहिल्या अयशस्वी रॉकेट प्रक्षेपणात स्वयं-नाश कमांडद्वारे रॉकेट नष्ट करावे लागले असल्याचे देखील जपानच्या स्पेस एजन्सीने स्पष्ट केले आहे. एक ऑनलाइन वार्ताहर परिषदेत जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीचे अध्यक्ष (Japan Aerospace Exploration Agency President ) हिरोशी यामाकावा (Hiroshi Yamakawa) यांनी सांगितले कि "एप्सिलॉन-6 रॉकेट पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी योग्य स्थितीत नव्हते आणि कागोशिमाच्या दक्षिणेकडील जपानी प्रांतातील उचिनौरा स्पेस (Uchinoura Space Center in the southern Japanese prefecture of Kagoshima) सेंटरमधून उड्डाण केल्यानंतर सात मिनिटांच्या आत त्याचे उड्डाण रद्द करावे लागले" 


"अपेक्षेनुसार कामगिरी झाली नसल्याबद्दल व आमच्या अपयशाबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत," असेही यामाकावा म्हणाले तसेच अपयशाच्या कारणाच्या तपासात मदत करण्याचे वचन दिले. JAXA अधिकार्‍यांनी सांगितले की रॉकेट सुरक्षितपणे उड्डाण करण्यास आणि नियोजित कक्षेत प्रवेश करण्यास सक्षम नसल्याचा समजल्या नंतर एजन्सीने आत्म-नाश (self-destruction ) सिग्नल पाठविला. JAXA च्या माहितीनुसार हे रॉकेट आणि पेलोड्स फिलिपाइन्सच्या (Philippines) पूर्वेकडील समुद्रात पडल्याचा अंदाज आहे.


एप्सिलॉन-6 हे रॉकेट आठ पेलोड वाहून नेत होते, ज्यात दोन दक्षिणेकडील फुकुओका (Fukuoka) येथील खाजगी कंपनीने विकसित केले होते. एप्सिलॉन रॉकेटद्वारा व्यावसायिकदृष्ट्या विकसित पेलोड वाहून नेण्याची ही पहिलीच वेळ होती. एप्सिलॉन-6 लाँचचे दिग्दर्शन करणाऱ्या यासुहिरो युनो (Yasuhiro Uno) यांनी कबूल केले की या अपयशामुळे भविष्यात एप्सिलॉनच्या संभाव्य लॉन्च व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. IHI Aerospace या जपानी कंपनीने, Epsilon-S या सुधारित आवृत्ती अंतर्गत पुढील वर्षी व्हिएतनामी उपग्रहासाठी  व्यावसायिक प्रक्षेपण नियोजित आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने