कोचीच्या समुद्रात एका पाकिस्तानी बोटीतून 200 किलो हेरॉईन जप्त.

 


कोचीच्या समुद्रात संयुक्त कारवाईत नौदल आणि एनसीबीला मोठे यश मिळाले आहे, तसेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबई आणि गुजरातच्या जामनगरमध्ये अमली पदार्थांवर मोठी कारवाई केली आहे. कोचीच्या समुद्रात एका पाकिस्तानी बोटीतून 200 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत करोडो रुपये आहे. एवढेच नाही तर 6 परदेशी नागरिकांनाही एजन्सीने अटक केली आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) पकडलेल्या पाकिस्तानी बोटीमध्ये 200 किलो हेरॉईन सीमेपलीकडून नदीमार्गे देशात आणले जात होते. या हेरॉईनची किंमत 2000 कोटी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले नागरिक पाकिस्तानचे असू शकतात, याची पुष्टी करण्यासाठी तपास सुरू आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे हि कारवाई केली.  

कोचीशिवाय इतर राज्यांमध्येही ड्रग माफियांविरोधात एनसीबीची कारवाई सुरू आहे. एनसीबीने गुजरातमधील जामनगर ते मुंबईपर्यंत कारवाई केली आहे. एनसीबीने एका पत्रकार परिषदेत सांगितले की एजन्सीने सुमारे 120 कोटी रुपयांचे 60 किलो उच्च दर्जाचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे आणि सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी एनसीबीने 6 जणांना अटकही केली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने