डिफएक्स्पो 2022 मध्ये विविध परवाना करार डीआरडीओ (DRDO) द्वारे 13 उद्योगांना सुपूर्द

 


गुजरातच्या गांधीनगर इथे 12 व्या डिफएक्स्पोमध्ये  20 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या ‘बंधन’ समारंभात, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) डीआरडीओ द्वारा विकसित करण्यात आलेल्या 10 तंत्रज्ञानांच्या तंत्रज्ञान हस्तांतरणविषयक (LAToT) 16 परवाना करार 13 उद्योगांना सुपूर्द करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते, यावेळी एकूण 451 सामंजस्य करार, तंत्रज्ञान करारांचे हस्तांतरण आणि उत्पादनांचा शुभारंभ झाला. 451 पैकी 345 सामंजस्य करार, 42 प्रमुख घोषणा, 46 उत्पादनांचा शुभारंभ आणि 18 टीओटी होते. 28 सामंजस्य करार आणि एका उत्पादनाचा शुभारंभ करण्यामध्ये गुजरातचा सहभाग होता. यासाठी 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. भारतीय वायु दल आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने 70 HTT-40 या स्वदेशी प्रशिक्षण विमानांसाठी 6,800 कोटी रुपयांचा करार केला.  

डीआरडीओने हस्तांतरित केलेल्या तंत्रज्ञानामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, लेसर तंत्रज्ञान, शस्त्रास्त्रे, भौतिक विज्ञान, लढाऊ वाहने, नौदल प्रणाली आणि सेन्सर्स वगैरे, याचा समावेश आहे. उत्पादनांमध्ये हँडहेल्ड ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार (जीपीआर), अनएक्सप्लोडेड ऑर्डनन्स हँडलिंग रोबोट (यूएक्सओआर), अॅल्युमिनियम मिश्र धातुंसाठी सेमी-सॉलिड मेटल (एसएसएम) प्रक्रिया तंत्रज्ञान, हाय ऑक्सिडेटिव्ह आणि थर्मल स्टेबिलिटी ऑईल (डीएमएस हॉट ऑइल-I), लढाऊ वाहनांसाठी न्यूक्लियर शिल्डिंग पॅड, अँटी-टँक ऍप्लिकेशनसाठी 120 मिमी टँडम वॉरहेड सिस्टम, उच्च ऊर्जा सामग्री (TNSTAD), लेसर-आधारित एंड गेम फ्यूज, मल्टी-केडब्ल्यू लेझर बीम डायरेक्टिंग ऑप्टिकल चॅनेल (बीडीओसी), शक्ती ईडब्ल्यू सिस्टम याचा समावेश आहे. ही उच्च तंत्रज्ञान उत्पादने सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाला चालना देतील आणि सशस्त्र दलांची कार्यक्षमता वाढवण्याबरोबरच, आत्मनिर्भरते द्वारे संरक्षण उत्पादन क्षेत्राला चालना देतील.

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, संरक्षण दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान, एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी, वायु दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी, नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, संरक्षण सचिव डॉ अजय कुमार आणि संरक्षण विभागाचे ओएसडी गिरीधर अरमाणे यांच्यासह इतर मान्यवर या समारंभाला उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने