शुक्रवारी संध्याकाळी तुर्कीच्या बार्टिन येथील कोळशाच्या खाणीत झालेल्या स्फोटात किमान 25 कामगारांना प्राण गमवावे लागले असून सुमारे 17 जण जखमी झाले आहेत तसेच साधारण डझनभर इतर लोक आणखीन जमिनीखाली अडकले आहेत अशी माहिती तुर्किचे आरोग्य मंत्री फहरेटिन कोका यांनी ट्विटरद्वारे दिली आहे जखमींपैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे, असे कोका यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
बार्टनच्या ब्लॅक सी प्रांतातील अमासरा जिल्ह्यातील एका कोळशाच्या खाणीत 300 मीटर (985 फूट) खोलवर संध्याकाळी 6:15 फायरडॅम्प स्फोट झाला, ट्रान्सफॉर्मरमुळे हा स्फोट झाला असल्याची माहिती आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने (AFAD) यांनी दिली. स्फोटाच्या वेळी एकूण 110 कामगार खाणीत होते, असे तुर्किचे गृहमंत्री सुलेमान सोयलू यांनी सांगितले. ते म्हणाले की त्यापैकी 49 जण खाणीच्या खोल भागात होते जेथे हा धोका जास्त आहे.
बार्टिनचे गव्हर्नर नुरताक अर्सलान यांच्या म्हणण्यानुसार, बचाव पथकांनी 14 खाण कामगारांना बाहेर काढण्यात यश मिळवले आहे, तर किमान 49 अजूनही अडकले असण्याची शक्यता आहे. घटनेनंतर लगेचच राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांच्या सूचनेनुसार गृहमंत्री मंत्री सुलेमान सोयलू आणि ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधन मंत्री फातिह डोनमेझ यांनी घटनास्थळी भेट दिली.
टिप्पणी पोस्ट करा