कर्नाटक येथे राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा दरम्यान' 4 कार्यकर्त्यांना विजेचा धक्का

 


कर्नाटकातील बेल्लारी येथे राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा दरम्यान एक अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे' मध्ये सहभागी 4 कार्यकर्त्यांना विजेचा धक्का बसला. विद्युत धक्कयामुळे जखमी झालेल्या सर्व कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी सकाळी बेल्लारी येथून यात्रा सुरू झाली तेव्हा काही कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे हाती दरले होते आणि ते झेंडे लोखंडी रॉड मध्ये धरले असल्यामुळे हा अपघात झाला असे समजते.

काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रे बरोबर असलेल्या रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी पीडितांवर उपचार केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी कर्नाटकातील बेल्लारीच्या संगनाकल गावातून यात्रा सुरू झाली होती, व यात्रा मौका नावाच्या ठिकाणी पोहचली या प्रवासा दरम्यान हा अपघात घडला. 

2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष हा जागरूक झाला आहे. देशभरात पिछाडीवर असलेल्या काँग्रेस पक्षासमोर कार्यकर्त्यांना जोडणे हे सर्वात मोठे आव्हान आहे, हे लक्षात घेऊन पक्षाने या यात्रेचे नावही भारत जोडो असे ठेवले. काँग्रेस पक्षाच्या यात्रेचे नेतृत्व स्वतः राहुल गांधी करत आहेत. हि भारत जोडो यात्रेत पक्षाला मोठा प्रतिसाद मिळत आहे असा विश्वास काँग्रेस कडून व्यक्त केला जात आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने