भारतीय क्रिकेट संघात निवड न झाल्याने हे 4 भारतीय खेळाडू निराश, आठवला देव

 


चेतन शर्माच्या (Chetan Sharma) नेतृत्वाखालील निवड समितीने सोमवारी, ३१ ऑक्टोबर रोजी भारतीय संघाच्या पुढील चार मालिकांसाठी चार वेगवेगळ्या संघांची (Indian cricket team) घोषणा केली आहे. या संघांमध्ये सुमारे दोन डझन खेळाडूंना संधी मिळाली आहे, मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही निवड न झाल्याने काही खेळाडू निराश झाले आहेत त्यांनी याबाबतच्या आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. यामध्ये पृथ्वी शॉ, नितीश राणा, रवी बिश्नोई आणि उमेश यादव (Prithvi Shaw, Nitish Rana, Ravi Bishnoi and Umesh Yadav) यांचा समावेश आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCI ने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेसाठी आणि ODI मालिकेसाठी संघाची निवड केली आहे. याशिवाय बांगलादेश दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी आणि दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठीही संघ जाहीर करण्यात आला आहे. या चार मालिकांमध्ये भारताचे नेतृत्व तीन वेगवेगळे कर्णधार करणार आहेत.

दुसरीकडे, पृथ्वी शॉची कोणत्याही संघात निवड झालेली नाही. अशा स्थितीत इंस्टा स्टोरीवर साई बाबांचा फोटो शेअर करताना त्याने लिहिले की, "आशा आहे साई बाबा तुम्ही सर्व काही पाहत असाल." त्याचवेळी उमेश यादवने टी-20 संघाबाहेर राहण्यावर लिहिले की, "तुम्ही मला मूर्ख बनवत असाल, परंतु हे लक्षात ठेवा की देव तुम्हाला पाहत आहे." उमेश हा कसोटी संघाचा भाग आहे.

नितीश राणा यांने देखील आपली निराशा व्यक्त केली असून लिहिले आहे कि, "HOPE म्हणजे  होल्ड ऑन, पेन एंड्स " त्याचबरोबर गेल्या अनेक महिन्यांपासून संघासोबत असलेल्या रवी बिश्नोईचीही संघात निवड झालेली नाही त्याने शेअर केले आहे कि "कमबॅक नेहमी अपयशापेक्षा मजबूत असतो ". न्यूझीलंडमध्ये फिरकीपटूंना यश मिळत नसल्याने बिश्नोईची टी-20 संघात निवड झालेली नाही.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने