चपाती 5% तर पराठ्यावर 18% जीएसटी लागणार, गुजरात AAR च्या मतानुसार चपाती आणि पराठा यात फरक

 


गुजरातच्या अपील अथॉरिटी ऑफ अॅडव्हान्स रुलिंग (AAR) ने म्हटले आहे की पराठे आणि सामान्य चपाती मध्ये मोठा फरक आहे, त्यामुळे आता पराठ्यावर 5% ऐवजी 18% GST लागू होईल. त्याच वेळी, चपातीवर सध्या 5% जीएसटी आकारला जातो.

तुम्ही जर पराठे खाण्याचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. आता तुम्हाला पराठ्याऐवजी चपाती खाणे स्वस्त पडणार असून पराठ्याचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. वास्तविक, अहमदाबादच्या वाडीलाल इंडस्ट्रीजने GAAR  (जनरल अँटी-अव्हॉइडन्स रुल्स) मध्ये याचिका दाखल केली होती की ते मिक्स व्हेज, मलबार सह 8 प्रकारचे पराठे तयार करतात. यासोबतच विविध प्रकारचे पराठे बनवण्यासाठी भाज्या, मेथी आणि इतर साहित्य वापरले जात असल्याचेही कंपनीने सांगितले होते. जर हे पदार्थ वापरले नाहीत तर सर्व पराठे सारख्याच चवीचे बनतील.

वाडीलाल इंडस्ट्रीजने सांगितले की, सर्व पराठे गव्हाच्या पिठापासून बनवले जातात. म्हणून, त्यांच्यावर चपाती प्रमाणेच कर आकारला जावा, परंतु अपील प्राधिकरण GAAR ने गुजरातच्या अथॉरिटी ऑफ अॅडव्हान्स रुलिंग (AAR) च्या जून 2021 चा आदेश कायम ठेवला आहे या आदेशानुसार रोटीवर 5% GST आणि पराठ्यावर 18% GST आकारला जातो.  

AAR ने म्हटले आहे की अपीलकर्त्याद्वारे पुरवले जाणारे पराठे हे  चपाती किंवा रोटीपेक्षा वेगळे आहेत. साध्या चपाती किंवा रोटीच्या श्रेणीत याचा विचार केला जाऊ शकत नाही, ज्याला GAAR (जनरल अँटी-अव्हॉइडन्स रुल्स) ने देखील समर्थन दिले. GAAR ने गुजरातच्या ऍथॉरिटी फॉर ऍडव्हान्स रुलिंगच्या (AAR) जून 2021 च्या आदेशाचे समर्थन केले, ज्यात असे म्हटले होते की पॅकेज केलेले पराठे दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत 3-4 मिनिटे भाजले जाणे आवश्यक आहे. साधी चपाती किंवा रोटी व पराठ्यात फरक आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, तामिळनाडू AAR ने पावडर स्वरूपात विकले जाणारे रेडी टू कुक डोसा, इडली, दलिया मिक्स इत्यादींवर १८% GST कर लागू होईल असा निर्णय दिला. त्याच वेळी, गुजरात AAR पुरी पापड आणि फ्राइड पापडवर 5 टक्के जीएसटी देय असल्याचा निर्णय दिला होता. यासोबतच डिसेंबर 2021 मध्ये कर्नाटक AAR ने रवा इडली डोसावर 18 टक्के GST भरावा लागेल असा निर्णय दिला होता. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने