भारतातील जॉब मार्केट गेल्या 5 महिन्यांच्या नीचांक पातळीवर.

 


आर्थिक मंदीच्या धोक्यामुळे भारतातील जॉब मार्केट गेल्या 5 महिन्यांच्या खालच्या पातळीवर असल्याचे दिसत आहे. नोकरीच्या रिक्त जागा गेल्या 5 महिन्यांपासून सतत कमी होत असून. मे महिन्यापासून सुरू झालेल्या नोकऱ्या कमी करण्याचा हा प्रकार आजतागायत सुरू आहे. एका सर्वे मधून हि माहिती समोर आली आहे. जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था सध्या आर्थिक मंदीच्या कचाट्यात आल्या आहेत, त्यामुळे नोकरीच्या बाजारपेठेतील मंदी कायम राहील असा तज्ज्ञांचा कयास आहे.

अमेरिका-युरोपसह जगातील अनेक भागांत महागाईने 4 दशकांतील उच्चांक गाठला आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी जगातील केंद्रीय बँका व्याजदर वाढवत आहेत. याबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की वाढत्या व्याजदरां मुळे आर्थिक मंदीची शक्यता वाढली आहे. अमेरिकेसारख्या अर्थव्यवस्थेचा जीडीपी वाढीचा दर सलग दोन तिमाहीत नकारात्मक नोंदवला गेला असून. त्यामुळे आर्थिक मंदी सुरू झाल्याचे बोलले जात आहे.आर्थिक मंदीच्या या काळात पांढरपेशी नोकऱ्यांना सर्वाधिक फटका बसू शकतो.

पांढरपेशी जॉब मार्केटमधील कमजोरी अशा वेळी येत आहे जेव्हा जगातील बहुतेक अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत अडकली असते. असे अनेक अहवाल समोर आले आहेत ज्यात ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये पांढरपेशी नोकऱ्यांमध्ये 20 टक्क्यांनी घट झाल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या 17 महिन्यांतील नोकऱ्यांच्या संख्येत झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने