काही सेकंदात डाउनलोड होईल चित्रपट, जाणून घ्या 5G शी संबंधित गोष्टी

 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 1 ऑक्टोबर रोजी भारतात 5G सेवा सुरू केली. 5G ला नेक्स्ट जनरेशन नेटवर्क सर्व्हिस असे संबोधले जात आहे. भारतातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या Airtel, Reliance Jio आणि Vodafone-Idea लवकरच त्यांच्या ग्राहकांना 5G सेवा देण्यासाठी तयार आहेत. भारतातील लोकांना आता त्यांच्या मोबाईल फोनमध्ये 5G सेवा वापरण्यासाठी थोडेच दिवस प्रतीक्षा करावी लागेल.

सध्या सुरु असलेल्या 4G मध्ये जास्तीत जास्त इंटरनेट गती 100 Mbps मिळते. तर 5G मध्ये तुम्हाला काही सेकंदात १गिबी डाउनलोड आणि अपलोड करता येऊ शकेल. आतापर्यंत कोणत्याही टेलिकॉम कंपनीने देशात 5G प्लान जाहीर केलेले नाही. इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये, जिओचे आकाश अंबानी म्हणाले की JIO 5G सेवा अतिशय स्वस्त दारात उपलब्ध करून देणार आहे. JIO 5G प्लॅन अशा प्रकारे ठेवला जाईल की प्रत्येक भारतीय 5G सेवा घेऊ शकेल.

5G सेवा प्रथम दिल्लीच्या IGI विमानतळावर सुरू होणार आहे. यंदाच्या दिवाळीपर्यंत ती दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये 5G सुरू होईल. नंतर अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, वाराणसी, चंदीगड, दिल्ली, जामनगर, गांधीनगर, मुंबई, पुणे, लखनौ, कोलकाता, सिलीगुडी, गुरुग्राम आणि हैदराबाद येथे 5G सेवा सुरू होईल. Airtel ने म्हटले आहे की मार्च 2023 पर्यंत देशातील अनेक शहरांमध्ये 5G सेवा सुरू करणार आहे. एअरटेलचे म्हणणे आहे की ते मार्च 2024 पर्यंत देशभरात 5G सेवा देणे सुरू करेल. VI ने आतापर्यंत 5G सेवेसाठी कोणतीही योजना जाहीर केलेली नाही.

तुमच्या परिसरात 5G सेवा उपलब्ध असल्यास, तुम्ही तुमच्या 5G सक्षम डिव्हाइसवर जलद इंटरनेट सेवेचा लाभ घेऊ शकाल. तुम्हालाही 5G सेवा घ्यायची असेल आणि तुम्हाला सध्याच्या मोबाईलवर 5G चालवायचा असेल तर त्यासाठी तुमचा मोबाइल 5G सक्षम असणे आवश्यक आहे. सध्या प्रत्येक स्मार्टफोन कंपनी विविध किंमतीमध्ये 5G फोन ऑफर करत आहे.

तुम्हालाही 5G नेटवर्कचा लाभ घ्यायचा असेल, तर यासाठी तुम्हाला 5G सक्षम स्मार्टफोन घ्यावा लागेल. 5G सेवा सुरू झाल्यामुळे कृषी, आरोग्य, वाहतूक, शिक्षण आणि ग्रामीण सामाजिक पायाभूत सुविधांवर खूपच मोठा परिणाम होणार आहे.5G हे भारतातील लोकांच्या दैनंदिन कामात अमुलाग्र बदल घडवणार आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने