जगातील तिसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी शुक्रवारी राजस्थानमध्ये 65,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. गौतम अदानी यांनी राजस्थानमध्ये पुढील पाच ते सात वर्षांत 10,000 मेगावॅट सौरऊर्जा क्षमता उभारण्यासाठी, सिमेंट प्लांटचा विस्तार करण्यासाठी आणि जयपूर विमानतळाच्या सुधारणांसाठी 65,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
राजस्थान 2022 परिषदेत बोलताना गौतम अदानी म्हणाले की अदानी समूहाची राज्यात आधीपासूनच गुंतवणूक आहे. हा समूह राजस्थानमध्ये थर्मल पॉवर प्लांट चालवतो,तसेच सोलर पार्कची स्थापना देखील करत आहे आणि राज्याच्या वीज निर्मिती युनिट्सना कोळसा पुरवठा करण्याचे काम देखील करतो. याशिवाय, अदानी समूह 10,000 मेगावॅट अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमतेसाठी 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक येणाऱ्या कालावधी करणार आहे.
या कार्यक्रमात बोलताना गौतम अदानी म्हणाले की पुढील 5 वर्षात सर्व प्रकल्प हळूहळू कार्यान्वित होईल. समूहाने अवघ्या आठवड्यापूर्वी राजस्थानमध्ये जगातील सर्वात मोठ्या पवन-सौर संकरित ऊर्जा प्रकल्पाचे व्यावसायिक चालन सुरू केले आहे. अंबुजा सिमेंट्स आणि एसीसीच्या अधिग्रहणानंतर अदानी समूह आपली सिमेंट उत्पादन क्षमता दुप्पट करण्याचा विचार करत आहे. गौतम अदानी म्हणाले की, राज्यात आमची सिमेंट उत्पादन क्षमता दुप्पट करण्यासाठी आम्हाला आणखी ७,००० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. अदानी समूह हा जयपूर विमानतळाचा ऑपरेटर आहे. औद्योगिक, व्यावसायिक, वाहतूक आणि घरगुती ग्राहकांसाठी स्वच्छ इंधनाच्या उपलब्धतेला गती देण्यासाठी आणि नूतनीकरणक्षम ऊर्जेकडे जाण्यासाठी नवीन ट्रान्समिशन लाइन्सची स्थापना करण्यासाठी हा समूह पाइप्ड नैसर्गिक वायू आणि CNG पुरवठ्यासाठी नेटवर्क देखील येत्या काळात विकसित करेल.
टिप्पणी पोस्ट करा