उत्तराखंडमध्ये येथील केदारनाथ धाममध्ये एक हेलिकॉप्टर कोसळले 7 ठार


 

ब्युरो टीम: उत्तराखंडमध्ये आज एक मोठी दुर्घटना घडली. केदारनाथ धाममध्ये दुपारी एक हेलिकॉप्टर कोसळले (A helicopter crash in Kedarnath Uttarakhand). या अपघातात पायलटसह 7 जणांचा मृत्यू झाला आहे. केदारनाथच्या दोन किलोमीटर आधी गरुडचट्टी येथे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.  रुद्रप्रयागपासून दोन किमी अंतरावर हे हेलिकॉप्टर कोसळले असल्याचे समजते. हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर ते गरुडचट्टीजवळ कोसळले. केदारनाथमध्ये दर्शन करून भाविक परतत असताना हा अपघात झाला. कोसळलया नंतर जोरात स्फोट झाल्याने हेलिकॉप्टरला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

माहिती मिळताच बचावकार्यासाठी पथक रवाना झाले. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. धुक्यात उडाण करणे हे अपघाताचे कारण बनले आहे. हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे असल्याचे सांगितले जात आहे, जेव्हा हे हेलिकॉप्टर केदार घाटीकडे निघाले तेव्हा ते गरुडचट्टी येथे कोसळले. हेलिकॉप्टर जमिनीवर पडल्याने आग लागली. विमानात पायलटसह ७ जण होते. सर्वांचा मृत्यू झाला आहे.

एसडीआरएफ आणि एनडीआरएफची टीम बचाव कार्यात सहभागी आहे. एसडीआरएफचे डीआयजी रिद्धिमा यांनी या अपघाताबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, "एसडीआरएफ आणि पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडली. ही घटना सकाळी 11.50 वाजता घडली. खराब हवामानामुळे बचावकार्यातही अडथळे येत आहेत." अशी माहिती ANI या वृत्त संस्थेने दिली आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने