ट्विटर कंपनीतील 75 टक्के कर्मचाऱ्यांना येत्या काळात नारळ देणार

 


इलॉन मस्कने ट्विटर अधिग्रहणाचा करार पूर्ण केला आहे, परंतु, करार पूर्ण होताच त्यांनी कंपनीतील 75 टक्के कर्मचाऱ्यांना कमी करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरवात केली आहे आणि त्याच्याशी संबंधित यादी तयार करण्यास सांगितले आहे. सर्वप्रथम ट्विटर अधिग्रहणानंतर, एलोन मस्कने अनेक उच्च पदस्थ कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकले आहे. या कर्मचाऱ्यांच्या यादीत कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांचाही समावेश आहे. आता इलॉन मस्क त्याच्या योजनेनुसार येणाऱ्या काळात बाकी कर्मचाऱ्यांना कधीही कामावरून काढून टाकु शकतो.

अलीकडेच विदेशी माध्यमांनी  एक अहवाल समोर आणला आहे, ज्यामध्ये असे आढळून आले आहे की एलोन मस्कने Twiiter मध्ये काम करणार्‍या अंदाजे 7,500 कर्मचार्‍यांपैकी 75 टक्के कर्मचारी काढून टाकण्यास सांगितले आहे. यात  सर्वस्तरातील कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. जेव्हा पहिल्यांदा इलॉन मस्क आणि ट्विटर यांच्यात डील झाल्याची बातमी समोर आली होती, त्यावेळी अशा प्रकारच्या बातम्या विदेशी माध्यमांनी समोर आणल्या होत्या.

इलॉन मस्क पुढील वर्षापर्यंत त्याच्या सध्याच्या व्यवस्थापनाच्या वेतनात $800 दशलक्षपर्यंत कपात करणार आहे. आता कंपनीने घेतलेले हे निर्णय कधी लागू होतात आणि त्याचा लोकांवर काय परिणाम होतो हे येणारा काळ सांगेल .

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने