सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा आज 80वा वाढदिवस.

 


शतकातील मेगास्टार आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस आहे. अमिताभ आता 80 वर्षांचे झाले आहेत. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी काल रात्री आपल्या चाहत्यांना एक आश्चर्याचा धक्का दिला.काल मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी त्याच्या ‘जलसा’ निवासस्थानाबाहेर जमलेल्या चाहत्यांना त्यांच्या निवास्थानाबाहेर येऊन अभिवादन केले व चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. अमिताभ यांना पाहून त्यांचे चाहते खूप खूश झाले.  

बिग बीं म्हणुन ओळखले जाणारे अमिताभ बच्चन  यांनी 1969 मध्ये 'सात हिंदुस्तानी' या सिनेमातून करिअरची सुरुवात केली होती. नंतर ते हृषिकेश मुखर्जी यांच्या 'आनंद' (1971) मध्ये डॉ. भास्कर बॅनर्जीच्या भूमिकेत दिसले, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. प्रकाश मेहरा यांच्या 'जंजीर' (1973) या अॅक्शन चित्रपटाने अमिताभ यांना बॉलीवूडमध्ये एक स्टार म्हणून प्रस्थापित केले आणि तेव्हापासून आतापर्यंत ते प्रेक्षकांना मनावर अधिराज्य गाजवत आहेत. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने