न्यायमूर्ती धनंजय वाय चंद्रचूड यांची 9 नोव्हेंबर 2022 पासून भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती

 


भारताच्या राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती धनंजय वाय चंद्रचूड यांची 9 नोव्हेंबर 2022 पासून भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे (President Appoints Justice DY Chandrachud As Next Chief Justice Of India). वर्तमान सरन्यायाधीश यू यू ललित यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती चंद्रचूड हे भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. 11 ऑक्टोबर रोजी वर्तमान सरन्यायाधीश यू यू ललित यांनी न्यायाधीश चंद्रचूड यांची उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली होती. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा सरन्यायाधीश (CJI) म्हणून कार्यकाळ 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत असेल.

न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती वायव्ही चंद्रचूड हे देखील 2 फेब्रुवारी 1978 ते 11 जुलै 1985 या काळात भारताचे 16 वे सरन्यायाधीश होते. न्यायमूर्ती चंद्रचूड हे त्यांच्या उदारमतवादी आणि पुरोगामी निर्णयांसाठी ओळखले जातात, सर्वात अलीकडील निर्णय म्हणजे अविवाहित महिलांच्या 24 आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याच्या अधिकारांचे समर्थन करणारा निकाल. 

ते याआधी देखील एका घटनापीठाचा भाग होते, ज्याने संमतीने समलैंगिकतेला गुन्हेगार श्रेणीतून बाद ठरवले आणि अनुच्छेद 21 अंतर्गत गोपनीयतेला मूलभूत अधिकार म्हणून मान्यता दिली. सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांच्या प्रवेशाच्या अधिकाराचे समर्थन करणाऱ्या निर्णयाचा देखील ते एक भाग होते. तसेच न्यायमूर्ती चंद्रचूड हे अयोध्या-बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल देणाऱ्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाचे सदस्य देखील होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने