गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) 6 महिन्यांनी वाढवला आहे (Centre extends AFSPA in 9 districts of Nagaland for 6 months). अधिसूचनेत म्हटले आहे की अरुणाचल प्रदेशातील तीन जिल्ह्यांमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा 1 ऑक्टोबर ते 30 मार्चपर्यंत वाढवण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेशातील तिरप, चांगलांग आणि लोंगडिंग जिल्ह्यांपर्यंत AFSPA विस्तारित करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेशातील नामसाई आणि महादेवपूर पोलिस ठाण्यांच्या अखत्यारीतील भागात AFSPA देखील वाढवला आहे. या भागाला गृह मंत्रालयाने अशांत क्षेत्र घोषित केले आहे. सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा, 1958 सुरक्षा दलांना कोणत्याही पूर्व वॉरंटशिवाय ऑपरेशन करण्यासाठी आणि कोणालाही अटक करण्याचा अधिकार देतो.
AFSPA कायदा 45 वर्षांपूर्वी संसदेने लागू केला होता. AFSPA कायदा अशांत भागात लागू करण्यात येतो. या कायद्यानुसार भारतीय लष्कर आणि सुरक्षा दलांना अनेक विशेष अधिकार देण्यात आले आहेत. AFSPA लागू असलेल्या क्षेत्रात कोणताही व्यक्ती कायदा मोडताना किंवा कोणत्याही प्रकारचा उपद्रव करताना दिसला, तर लष्कर त्याला तत्काळ अटक करू शकते. याशिवाय या भागात लष्कर कोणत्याही संशयास्पद व्यक्तीला अटक करू शकते. अटकेनंतर लष्कर आपल्या अधिकारांचा वापर करून कारवाई करण्यास मोकळे असते.
टिप्पणी पोस्ट करा