हा माजी क्रिकेटपटू झाला BCCI चा नवा बॉस

 



ब्युरो टीम : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला अर्थात 'बीसीसीआय'ला  अखेर नवे अध्यक्ष मिळाले आहेत. बरेच दिवस सुरु असलेल्या या पदाच्या चढाओढीत आज भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी  यांनी बाजी मारली आहे. बिन्नी यांची निवड झाल्यानंतर  सौरव गांगुली यांनी हे पद सोडले आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी भारतीय क्रिकेटपटू रॉजर बिन्नी माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या जागी बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. ही निवडणूक केवळ औपचारिकता होती कारण त्यांची निवड आधीच ठरलेली होती.

'बीसीसीआय'च्या अध्यक्षपदाची जबाबदारी गांगुलीला २०१९ मध्ये मिळाली होती. पुढील तीन वर्षांसाठी ते पुन्हा निवडून येऊ शकले असते. पण त्यांना कोणीही साथ दिली नाही. त्यामुळेच आता बीसीसीआयचा कारभार रॉजर बिन्नी पाहतील.

तर, बीसीसीआयची नवी कार्यकारिणी सुद्धा तयार झाली असून त्यात रॉजर बिन्नी (अध्यक्ष), जय शहा (सचिव),  आशिष शेलार (खजिनदार ),  राजीव शुक्ला (उपाध्यक्ष ),  देवजित सैकिया (सहसचिव ) व  अरुण धुमल (आयपीएलचे चेअरमन) यांचा समावेश आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने