BCCI चा नवा बॉस रॉजर बिन्नी कोण आहे?

 

ब्युरो टीम : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला अर्थात 'बीसीसीआय'ला  अखेर नवे अध्यक्ष मिळाले आहेत. बरेच दिवस सुरु असलेल्या या पदाच्या चढाओढीत आज भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी  यांनी बाजी मारली आहे. बिन्नी यांची निवड झाल्यानंतर  सौरव गांगुली यांनी हे पद सोडले आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी भारतीय क्रिकेटपटू रॉजर बिन्नी माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या जागी बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. पण तुह्माला माहिती आहे का, रॉजर बिन्नी कोण आहेत ? चला तर जाणून घेउयात बिन्नी यांच्याबाबत खास गोष्टी...

रॉजर बिन्नी आहेत माजी खेळाडू

रॉजर बिन्नी हे देखील सौरव गांगुलीसारखे भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आहेत. बिन्नी हे ९१८३ चा  विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होते. ते या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही ठरले होते. ६७ वर्षीय बिन्नी हे भारतीय संघाचे निवडकही राहिले आहेत. वेगवान गोलंदाज असण्याव्यतिरिक्त, बिन्नी खालच्या फळीतील एक उत्कृष्ट फलंदाजदेखील होते आणि संघाला काही वेळा कठीण प्रसंगी तारण्याचे कामही त्यांनी केले आहे. रॉजर बिन्नी बीसीसीआयचे ३६ वे अध्यक्ष आहेत. १९२८ मध्ये आर. ई. ग्रँट गोवन बीसीसीआयचे पहिले अध्यक्ष झाले. १९३३ पर्यंत ते या पदावर राहिले. भारताने पहिला कसोटी सामना १९३२ मध्ये खेळला होता. सौरव गांगुली हा बीसीसीआयचा अध्यक्ष बनणारा पहिला क्रिकेटर होता. रॉजर बिन्नी हे पहिले बीसीसीआय अध्यक्ष आहेत, जे वर्ल्ड चॅम्पियन राहिले आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने