गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोन महिलांचा मृत्यू.

 


गुजरातमध्ये  एका अपघातात दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात ५ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यातील वडोदरा जिल्ह्यातील दिवाळीपुरा भागात एका घराला आग लागली. जिथे गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. सध्या पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

वडोदरा जिल्ह्यातील दिवाळीपुरा भागातील देव नगर सोसायटीच्या इमारतीत एका घराला अचानक आग लागली. त्यामुळे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोन महिलांचा मृत्यू झाला. त्याचवेळी या अपघातात अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. आगीतील सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. स्फोटामुळे आसपासच्या 12 घरांचेही मोठे नुकसान झाल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने