बॉक्स ऑफिसवर विक्रम वेधा चित्रपटाची निराशाजनक सुरवात.

 


हृतिक रोशन आणि सैफ अली खानच्या 'विक्रम वेधा' या चित्रपटाला चांगले रिव्ह्यू मिळाले असले तरी त्याची ओपनिंग निराशाजनक झाली असून. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी देखील फारशी कमाई केली नाही. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच हा चित्रपट चांगला व्यावसाय करेल असे तज्ज्ञांचे मत होते. पण तसे झाले नाही. मात्र, येत्या काही दिवसांत त्याचे संकलन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विक्रम वेधा हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट दक्षिणेकडील चित्रपटाचा रिमेक आहे, याचे दिग्दर्शन पुष्कर-गायत्री यांनी केले आहे. हृतिक रोशन आणि सैफ अली खानच्या या सिनेमाची जादू दुसऱ्या दिवशीही चालली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी जवळपास 12.50-14 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 10.58 कोटींची कमाई केली होती.

हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या व्यतिरिक्त विक्रम वेधमध्ये मराठी अभिनेत्री राधिका आपटे, शारिब हाश्मी, रोहित सराफ, योगिता बिहानी आणि सत्यदीप मिश्रा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ शहरावर हा चित्रपट बेतला आहे. यामध्ये हृतिक गँगस्टर तर सैफ पोलिसाची भूमिका साकारत आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने