अरुणाचल प्रदेशातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. या अपघातात एक पायलट शहीद झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात बुधवारी हा अपघात झाला. भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले. ज्यामध्ये एका पायलटला आपला जीव गमवावा लागला. भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी या अपघाताला दुजोरा दिला आहे.
अपघाताचा तपास सुरू करण्यात आला आहे. लष्कराचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास नियमित प्रवासादरम्यान हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. अपघात झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट होते. जे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. दोघांना जवळच्या लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी एका पायलटला मृत घोषित केले.
लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव असे शहीद झालेल्या पायलटचे नाव आहे. तर दुसऱ्या पायलटवर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर जामिथांग सर्कलच्या बीटीके क्षेत्राजवळ न्यामजांगचू येथे कोसळले. हे चीता हेलिकॉप्टर 5 व्या पायदळ विभागाचे कमांडिंग जनरल ऑफिसर यांना सोडल्यानंतर सुरवा सांबा भागातून येत होते.
टिप्पणी पोस्ट करा