आमच्या नेत्यांबद्दल वाईट ऐकून घेणार नाही, राणे यांचा ठाकरे गटाला इशारा.

 


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर टीका करताना त्यांच्या भाषणाचा देखील चांगलाच समाचार घेतला. नारायण राणेंनी यांनी आम्ही आमच्या नेत्यांबद्दल वाईट ऐकून घेणार नाही असा इशारा ठाकरे गटाला दिला आहे. तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आमच्या नेत्यावरील टीकेमुळे निर्माण झाला तर यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार असतील असं राणेंनी म्हटलं आहे.

मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राणेंनी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यातील वक्त्यांवरही टीका केली. वक्त्यांची यादी पाहिल्यावर वैचारिक स्तर घसरल्याचं जाणवलं, असं राणे म्हणाले. तसेच भाजपा आणि शिंदेवर टीका करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांचा पक्षातील कामाचा अनुभव काय आहे असा सवालही राणेंनी विचारला. या लोकांना फक्त नारायण राणेंवर बोलण्यासाठी आणलं होतं काय, असा टोलाही नारायण राणेंनी लगावला. 

“दसरा मेळाव्यात केलेली टीका ही केलेल्या उपकारांची परतफेड आहे का?" असा प्रश्न देखील राणेंनी उपस्थित केला असुन.  "२०१९ ला मोदींचं नाव आणि फोटो लावून खासदारकी आणि आमदारकीची निवडणूक लढली" असेही ते म्हणाले. "मोदींच्या नावावर निवडून आले आणि त्यांच्यावर टीका करता,” असं बोलत राणेंनी आपला संताप व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने