मी सहज षटकार मारतो, हीच माझी ताकद : इशान किशन

 


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रांची वनडे सामन्यात 84 चेंडूत 93 धावांची स्फोटक खेळी खेळून भारताचे मालिकेतील आव्हान कायम ठेवणाऱ्या इशान किशनने आपल्या कालच्या डावात चौकारांपेक्षा जास्त षटकार लगावले. त्याच्या कालच्या पूर्ण खेळीत त्याने फक्त 4 चौकार मारले, तर षटकारांची संख्या 7 होती . टी-20 क्रिकेटमध्ये काही मोजकेच फलंदाज आहेत, जे इशान किशनसारखे सहज षटकार मारू शकतात.

सामन्यानंतर पत्रकार परिषदेत जेव्हा त्याला स्ट्राइक रोटेट करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला की, स्ट्राइक रोटेटिंग ही काही खेळाडूंची ताकद असते, तर कुणाची ताकद षटकार मारणे असते आणि माझ्यासाठी षटकार मारणे तसेच खूप.सोपे आहे. मी सहज षटकार मारतो, हीच माझी ताकद आहे. जर मी माझे काम षटकारांसह करत असेल, तर मी जास्त स्ट्राइक रोटेटिंग करण्याचा विचार करत नाही." परंतु पुढे तो असेही म्हणाला की "असे अनेक डाव असतात जेथे रोटेशन देखील आवश्यक असते. जर सुरवातीला विकेट पडल्या असतील तर त्यासाठी आपण तयार राहणे आवश्यक आहे, परंतु षटकार मारण्या सारखा चेंडू असेल तर षटकार मारणे टाळायचे नाही."

कालच्या सामन्यात 279 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची पुन्हा एकदा खराब सुरुवात झाली होती आणि केवळ 48 धावांच्या स्कोअरवर संघाने दोन सलामीवीर गमावले होते. पण श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 161 धावांची भागीदारी करून सामना दक्षिण आफ्रिकेच्या हातून हिसकावून घेतला. किशनच्या 93 धावांच्या खेळीव्यतिरिक्त, श्रेयस अय्यरने 113 धावांची नाबाद खेळी केली, ज्याच्या बळावर भारतीय संघाने 25 चेंडू बाकी असताना 7 गडी राखून सामना जिंकला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने