उच्च शिक्षणासंदर्भात भारत-नॉर्वे संयुक्त कार्यगटाची बैठक

 


नवी दिल्ली येथे 11 ऑक्टोबर 2022 रोजी भारताने उच्च शिक्षणासंदर्भातील  भारत-नॉर्वे संयुक्त कार्यगटाची 6 वी बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी  भारताकडून शिक्षण मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य सहसचिव नीता प्रसाद तर नॉर्वेकडून शिक्षण आणि संशोधन मंत्रालयाच्या महासंचालक ॲन लाइन वोल्ड या अध्यक्षस्थानी होत्या.

भारत आणि नॉर्वे यांच्यात 25 एप्रिल 2022 रोजी स्वाक्षरी केलेल्या उच्च शिक्षण क्षेत्रातील सहकार्यावरील सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी आणि पर्यवेक्षण  करण्यासाठी संयुक्त कार्य गटाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच उभय  देशांकडून यावेळी 2014 मध्ये स्वाक्षरी केलेल्या पूर्वीच्या भारत-नॉर्वे सामंजस्य कराराच्या कक्षेत विकसित केलेल्या इंडो-नॉर्वेजियन सहकार्य कार्यक्रमांतर्गत झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला आणि एकूण उच्च शिक्षण धोरण आणि प्राधान्यक्रम, विद्यार्थी/शिक्षकांची गतिशीलता आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात सहकार्य यावर चर्चा करण्यात आली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने