नाना पटोले यांच्या आरोपांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही : देवेंद्र फडणवीस

 


शिंदे-फडणवीस सरकार हे ED सरकार असून सक्तवसूली संचालनालयाची ( ED) कारवाई केवळ विरोधी पक्षातील नेत्यांवर होत आहे, भाजपच्या एकाही नेत्यावर केली जात नाही, असा आरोप पटोले यांनी केला होता यावर पत्रकारांनी लक्ष वेधले असता,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  म्हणाले, "नाना पटोले यांच्या आरोपांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही, ते रोज असे आरोप करीत असतात." ते अमरावती येथे पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले ”काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे रोज वेगवेगळे आरोप करीत असतात. प्रसारमाध्यमे त्यांच्याकडे लक्ष देत नाही, यामुळे ते उलट-सुलट आरोप करून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांना तेवढेच काम आहे, आम्हाला भरपूर कामे करायची आहेत”, असा टोलाही  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंना लगावला  

अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 2021-22 या वर्षातील अखर्चित निधीचा आढावा घेण्यात आला असून, तो योग्य ठिकाणी खर्च होत असेल, तर त्याला मान्यता दिली जाईल, अन्यथा तो योग्य कामांवर वळवला जाईल. गेल्या सरकारच्या काळात झालेल्या कामांबद्दल काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्याची माहिती घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असेही  फडणवीस यांनी यावेळी सांगितले.   

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने